तरुण भारत

मिरज-मालगांव रस्ता रुंदीकरणासाठी रस्ता रोको

मिरज शहर सुधार समितीचे आंदोलन

मिरज/प्रतिनिधी

मिरज-मालगांव हा शहराला जोडणारा महत्वाचा रस्ता आहे. या रस्त्यावरील वाढलेली नागरी वस्ती, वाहनधारकांची संख्या आणि रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्याने रस्ता अरुंद झाला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असलेल्या या रस्त्यावरील अतिक्रमणे हटवून रस्ता रुंदीकरणाच्या मागणीसाठी मिरज शहर सुधार समितीने सोमवारी अमनगर येथे रस्ता रोको आंदोलन केले. सुमारे अर्धा तास वाहतूक रोखून धरल्याने वाहतुकीची प्रचंड कोंडी निर्माण झाली. सांगलीचे आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेत या रस्त्यासाठी आमदार सुरेश खाडे यांच्याशी चर्चा करून पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

मिरज पूर्व भागातील सुभाषनगर, मालगाव, टाकळी, बोलवाड, गुंडेवाडी, मल्लेवाडी, खंडेराजुरी, सलगरे, बेळंकी, पायाप्पाचीवाडी, कवठेमहांकाळ, सह कर्नाटकला जाणाऱ्या वाहनधारकांची संख्या मोठी आहे. शिवाय या रस्त्याच्या दोन्ही बाजूस कलावतीनगर, इंदिरानगर, पूर्व दत्त्त कॉलनी, पश्श्चिम दत्त्त कॉलनी, खोतनगर, महादेव कॉलनी, एकता कॉलनी, अमननगर, दर्गाह कॉलनी असे सुमारे 25 हजारांहून अधिक लोकसंख्या असलेले उपनगरे आहेत.

या रस्त्यावरील अनेक मालमत्त्ताधारकांनी नैसर्गिक नाला मुजवून अतिक्रमण करून घरे बांधले आहेत. अनेकांनी रस्त्यावरच वाळू, भंगार, लोखंड विक्रीचे डेपो (दुकाने) थाटली आहेत. रस्ता अरुंद झाल्याने दररोज अपघात घडत आहेत. याबाबत मिरज शहर सुधार समिती सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठपुरावा करत आहे. मात्र, अधिकारी केवळ वेळ मारून नेत असल्याने समितीने सोमवारी रस्ता रोको आंदोलन केले.

Related Stories

सांगली : सावळजमध्ये अग्रणी नदीच्या महापुराने हाहाकार

Abhijeet Shinde

सांगली : मुख्य बाजार पेठेतील १०० अतिक्रमणावर हातोडा

Abhijeet Shinde

सांगली : वाळवा तालुक्यात प्रशासनाला कोरोनाचा हादरा

Abhijeet Shinde

सांगली : खानापूर तालुक्यात कोरोनाने दुसरा मृत्यू

Abhijeet Shinde

सांगली : शाहिरी लोककलेतून सुरेश पाटीलांचा प्रबोधनाचा जागर

Abhijeet Shinde

पूर प्रवण भागातील नागरिकांनी जनावरे, आवश्यक साहित्यासह त्वरित स्थलांतरीत व्हावे : जयंत पाटील

Abhijeet Shinde
error: Content is protected !!