तरुण भारत

टाटा मोटर्सची पंच दाखल

5.49 लाख सुरूवातीची किंमत – इग्नीस, किगरला टक्कर

वृत्तसंस्था/ मुंबई

Advertisements

टाटा मोटर्सची सुव्ह गटातील पंच ही कार अखेर सोमवारी बाजारात दाखल झाली आहे. सदरच्या कारची सुरूवातीची किंमत 5.49 लाख रुपये इतकी असणार आहे. विविध चार प्रकारात दाखल करण्यात येणारी ही गाडी मॅन्युअल आणि एएमटी ट्रान्स्मीशनसह आली आहे. सदरची गाडी मारूती सुझुकीच्या इग्नीस, रेनॉच्या किगर व महिंद्राच्या कुव्ह 100 एनएक्सटीला टक्कर देईल असे सांगितले जाते.

प्युअर, प्युअर रिदम पॅक, ऍडव्हेंचर, ऍडव्हेंचर रिदम पॅक अशा विविध गटातील कारची किंमत ही 5 लाख 49 हजार ते 9 लाख 39 हजार रुपये इतकी असणार आहे. सुरक्षिततेच्या मानांकनात या कारला फाइव्ह स्टारचे रेटिंग मिळाले आहे. क्रॅश टेस्टमध्ये वरचे रेटिंग मिळवणारी पंच ही टाटाची तिसरी कार असल्याचे सांगितले जाते. याआधी 2018 मध्ये दाखल झालेल्या नेक्सॉनला आणि 2020 मध्ये दाखल झालेल्या अल्ट्रोज हिला असे रेटिंग मिळाले होते.

Related Stories

‘अल्काझार’ने एमजी हेक्टरला टाकले मागे

Amit Kulkarni

रॉयल एनफिल्डने उत्पादन थांबविले

Amit Kulkarni

बजाजची नवी पल्सर 250 एफ लवकरच

Patil_p

वाहन निर्यात 18.87 टक्क्यांनी घटली

Patil_p

वाहन विक्री वाढीने उत्साहाचे वातावरण

Amit Kulkarni

बीएमडब्ल्यूच्या यंदा 25 नव्या मोटारी

Patil_p
error: Content is protected !!