तरुण भारत

रिलायन्सकडून मनिष मल्होत्राच्या कंपनीत हिस्साखरेदी

40 टक्के हिस्सा खरेदी – भारतासह विविध देशात व्यवसाय विस्ताराची संधी

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisements

रिलायन्स ब्रँडस लिमिटेडने फॅशन डिझाइनर मनिष मल्होत्रा यांच्या एमएम स्टाइल्स लिमिटेडमधील 40 टक्के हिस्सा खरेदी करण्याचे ठरवले असल्याचे समजते.

हिस्सा खरेदीविषयी उभयतात चर्चा झाली असल्याचे सांगण्यात येत असून यासंबंधातला करार पार पडला आहे. यानुसार रिलायन्स ब्रँडस् एमएममधील 40 टक्के हिस्सा खरेदी करणार आहे. खासगीरित्या चालवण्यात येणाऱया फॅशन ब्रँडमध्ये गुंतवणूक करण्याचा हा पहिला व्यवहार असल्याचे बोलले जात आहे. सदरची धोरणात्मक भागीदारी ही उभयतांसाठी दीर्घकाळासाठी व्यवसाय देशात आणि देशाबाहेर वाढीसाठी महत्त्वाची ठरणार आहे.

भागीदारी ठरणार लाभदायक -इशा अंबानी

रिलायन्स रिटेल वेंचर्सच्या संचालिका इशा अंबानी यांनी, सदरची धोरणात्मक भागीदारी ही महत्त्वाचीच आहे. मनिष मल्होत्रा यांच्या कल्पक डिझाइन्सना खूप मोठा प्रतिसाद लाभतो आहे. देशासह इतर देशातही त्यांच्या डिझाइन्सना पसंती आहे. भविष्याचा वेध घेत आपली डिझाइन्स साकारण्यात मनिष यांचा मोठा वाटा राहिला आहे. त्यामुळे या भागीदारीचा लाभ भविष्यात उत्तमपणे होईल अशी आशा  असल्याचे इशा अंबानी यांनी म्हटले आहे.

Related Stories

थेट विदेशी गुंतवणुकीत वाढ

Patil_p

हरुन ग्लोबलच्या यादीत अंबानींची झेप

Patil_p

पेटीएमचा धक्का, सफायरचा दिलासा

Amit Kulkarni

शेअर बाजारात चौथ्या दिवशी तेजी कायम

Amit Kulkarni

हवाई प्रवास महागणार

Amit Kulkarni

कोरोनाचा प्रभाव : पेटीएमच्या व्यवहारांमध्ये वाढ

tarunbharat
error: Content is protected !!