तरुण भारत

टोयोटा उत्पादनात करणार घट

जागतिक स्तरावर 15 टक्के कपात – चिपच्या टंचाईचा परिणाम

वृत्तसंस्था/ बेंगळूर

Advertisements

वाहन उद्योगातील कंपनी टोयोटा मोटर कॉर्प जागतिक स्तरावर आगामी काळात कार उत्पादनात घट करणार असल्याचे सांगितले जाते. वाहनांकरीता लागणाऱया सुटय़ा भागांच्या अपुऱया पुरवठय़ाखातर सदरचा निर्णय कंपनीने घेतला आहे.

आगामी पुढच्या म्हणजेच नोव्हेंबरमध्ये कंपनीने वाहन उत्पादनात 15 टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. सदरचे उत्पादन कमी करण्यामागे चिपची टंचाई हेच सांगितले जात आहे. जपानमधील ही सर्वात आघाडीवरची कार उत्पादन करणारी कंपनी आहे. नोव्हेंबरमध्ये कंपनी 1 लाख ते दीड लाख इतक्याच मोटारींचे उत्पादन घेणार आहे. सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात मोटारीसाठीच्या सुटय़ा भागांचा पुरवठा अनियमित राहिल्याने कंपनीच्या मलेशिया आणि व्हिएतनाम येथील कारखान्यातील उत्पादन घटवण्यात आले आहे.

Related Stories

व्हॉट्सअपचे आता नवे फिचर

tarunbharat

टायटन, एसबीआय आणणार अनोखे घडय़ाळ

Patil_p

होम फर्स्ट फायनान्स उभारणार 99 कोटी

Patil_p

फ्लिपकार्ट आता करणार नेपाळमध्ये विक्री

Patil_p

ऍक्सीस बँकेचा हय़ुंडाईशी करार

Patil_p

फार्मा उद्योगाला पीएलआय स्कीम लागू

Patil_p
error: Content is protected !!