तरुण भारत

आणखी 70 कंपन्यांचे आयपीओ येणार

आयपीओत अमेरिकाच अव्वल – सल्लागार कंपनी इवायइचा अहवाल

वृत्तसंस्था/ मुंबई

Advertisements

येणाऱया कालावधीत आणखी 70 कंपन्यांचे आयपीओ भारतीय भांडवली बाजारात दाखल होणार असल्याची माहिती आहे. दरम्यान यावर्षी पहिल्या 9 महिन्यात 9.7 अब्ज अमेरिकी डॉलर्सची रक्कम उभारली जाऊन जगातील आघाडीवरच्या आयपीओ बाजारात भारत स्थान मिळवू शकतो, असेही सांगितले जात आहे.

पण ही रक्कम जागतिक स्तरावर आयपीओ निधीच्या तुलनेत 3 टक्के इतकीच नोंदली जाते. सप्टेंबरपर्यंत संपूर्ण जगभरात आयपीओतून आतापर्यंत 330.66 अब्ज डॉलर्सची रक्कम उभारली गेली आहे. मुख्य सल्लागार कंपनी इवायइ यांच्या अहवालातून ही माहिती देण्यात आली आहे.

प्रमाण 4 टक्केच

2021 च्या जानेवारी ते सप्टेंबर कालावधीत भारतात एकूण 72 आयपीओ सादर करण्यात आले. जगभरात दाखल झालेल्या आयीपीओंची गणना करता हे प्रमाण मात्र 4.4 टक्के इतके आहे.

जगातिक स्तरावर 1635 आयपीओ बजारात

जागतिक स्तरावर विचार केल्यास सप्टेंबरपर्यंत नऊ महिन्यात एकूण 1635 आयपीओ सादर करण्यात आले आहेत. आयपीओ सादर करण्यात अमेरिका हा देश आघाडीवर राहिला आहे. यानंतर चीनचा नंबर लागतो. आशिया-पॅसिफीक क्षेत्रात एकंदर 750 आयपीओ सादर करण्यात आले आहेत. यात दर वर्षी 35 टक्के इतकी वाढ दिसली आहे.

Related Stories

सेन्सेक्स निर्देशांक 209 अंकांनी तेजीसह बंद

Amit Kulkarni

एचसीएल करणार 20 हजार जणांची भरती

Patil_p

जेफ बेजोस फोर्ब्सच्या यादीत अग्रस्थानी

Patil_p

‘डि मार्ट’कडून चार वर्षांत मजबूत परतावा

Patil_p

ऑनलाईन फार्मा उद्योगावर टाटाचे लक्ष्य

Patil_p

तिसऱया सत्रात सेन्सक्सची 789.70 अंकांची उसळी

Patil_p
error: Content is protected !!