तरुण भारत

रत्ने, दागिन्यांच्या निर्यातीत दमदार वाढ

एप्रिल-सप्टेंबरमध्ये निर्यातीत 134 टक्के वाढः सोन्याचे दागिने सर्वाधिक

वृत्तसंस्था/ मुंबई

Advertisements

यंदा एप्रिल ते सप्टेंबरच्या कालावधीमध्ये रत्ने आणि दागिन्यांच्या निर्यातीमध्ये जवळपास शंभर टक्के इतकी वाढ झाली असल्याची माहिती समोर आली आहे. त्याचप्रमाणे सोने आणि चांदीच्या दागिन्यांची निर्यातही जवळपास याच कालावधीत 262 टक्के इतकी वाढली असल्याचे दिसून आले आहे.

सदरची माहिती रत्न आणि आभूषणांशी संबंधित संघटनेने नुकतीच दिली आहे. रत्ने आणि दागिन्यांची निर्यात गेल्या सप्टेंबरमध्ये 29 टक्के इतकी वाढून 23 हजार 259 कोटी रुपयांवर पोहोचली आहे. वर्षाच्या आधी याच कालावधीमध्ये 17 हजार 936 कोटी रुपयांच्या दागिने आणि रत्नांची निर्यात करण्यात आल्याची माहिती आहे. चालू आर्थिक वर्षामध्ये एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीमध्ये रत्ने आणि दागिन्यांची निर्यात मात्र आर्थिक वर्षाच्या समान कालावधीच्या तुलनेमध्ये जवळपास 134 टक्के जास्त करण्यात आली आहे. 1 लाख 40 हजार 412 कोटी रुपयांच्या दागिने आणि रत्नांची निर्यात करण्यात आली होती. बाजारामध्ये परिस्थिती सर्वसामान्य होत असून दागिने आणि रत्नांना मागणी गेल्या काही महिन्यात वाढल्याचे दिसून आले आहे. ग्राहकांचा कल खरेदीवर दिसून येत असल्याने वाढीला प्रोत्साहन मिळताना दिसते आहे.

सोन्याच्या दागिन्यांची निर्यात विक्रमी

या वषी एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीमध्ये सोन्याच्या दागिन्यांची निर्यात 262 टक्के वाढून 29 हजार 379 कोटी रुपयांवर पोहोचली आहे. चांदीच्या दागिन्यांची निर्यात 48 टक्के वाढून 9 हजार 477 कोटी रुपयांची झाली आहे. मागच्या वषी हीच निर्यात 6 हजार 392 कोटी रुपयांची झाली होती. उत्सवी काळामध्ये सोन्याच्या दागिन्यांनाही मागणी असते. त्याचप्रमाणे डिजिटल गोल्ड, ईटीएफ, गोल्ड बॉन्ड यामध्येही खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल दिसून आला होता.

Related Stories

सौदी अरेबिया तेलाच्या किमती घटवणार

Patil_p

‘एलजी’ आता एआय सेवा विकसित करण्याच्या तयारीत

Patil_p

ऍपलमुळे भारतात 20 हजार जणांना मिळाला रोजगार

Patil_p

नवीकरणीय ऊर्जेचे मोकळे आकाश

Omkar B

महाविकास आघाडी सरकारची सुंदोपसुंदी कधी संपणार

Patil_p

लिखिता इन्फ्रास्ट्रक्चरला मिळाले कंत्राट

Patil_p
error: Content is protected !!