तरुण भारत

गोमयापासून देवदेतांच्या मूर्ती

गोमय अर्थात गायीचे शेण अनेक कारणांसाठी उपयुक्त मानले जाते. आता या उपयोगांच्या सूचीत आणखी काही उपयोगांची भर पडली आहे. गोमयापासून देवदेवतांच्या मूर्ती बनविण्याचे प्रशिक्षण लखनौच्या मनकामेश्वर मंदिरात दिले जात आहे. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींमुळे होणारे प्रदूषण गोमयापासून तयार केलेल्या मूर्तींमुळे नाहीसे करता येते. या मूर्ती विसर्जनानंतर पाण्यात पटकन विरघळतात. त्यामुळे गणपतीच्या मूर्ती तयार करण्यासाठीसुद्धा गोमय उत्कृष्टरीत्या उपयोगात आणले जाऊ शकते. शिवाय ते प्लास्टर ऑफ पॅरिसपेक्षा किंवा अन्य कोणत्याही कृत्रिम पदार्थापेक्षा स्वस्त आणि सहजगत्या उपलब्ध असल्याने मूर्ती बनविण्याचा खर्चही पुष्कळ प्रमाणात कमी करता येतो, असे दिसून येते.

“Brahma cow isolated on white background. Photographed in Delhi,India.”

गोमय हिंदू धर्मात पवित्र मानले गेल्याने त्यापासून बनविलेल्या मूर्तींवर कोणाचाही आक्षेप येणार नाही, अशी मनकामेश्वर मंदिराच्या व्यवस्थापकांची खात्री आहे. या मंदिराचे मुख्य महंत देव्यागिरी यांनी हा प्रयोग सुरू केला आहे. गोमयामध्ये विशिष्ट नैसर्गिक पदार्थांचे मिश्रण करून टिकाऊ मूर्ती तयार करण्याचे तंत्र त्यांनी विकसित केले आहे. केवळ मूर्तीच नव्हे तर पणत्या आणि इतर प्रकारचे दिवे यापासून तयार केले जातात. दिवाळीला आरास किंवा सजावटीसाठी पणत्या लावण्याची पद्धत भारतात सर्वत्र आहे. मातीच्या पणत्यांऐवजी गोमयाच्या पणत्या लावल्यास ते अधिक लाभदायक आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. या तंत्रज्ञानामुळे महिलांना मोठय़ा प्रमाणावर रोजगारही मिळू शकणार आहे.

Advertisements

Related Stories

तरुणांना चुकीच्या मार्गावर जाण्यापासून सुरुवातीलाच रोखावे !

Patil_p

गलवानचे नायक कर्नल संतोष बाबूंना महावीर चक्र

Patil_p

सर्वोच्च न्यायालयाने लसीकरणावरुन केंद्राला फटकारले

Abhijeet Shinde

जम्मू काश्मीरमध्ये दिवसभरात 525 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

Rohan_P

देशात वीज संकट; 3 दिवस पुरेल एवढाच कोळसा उपलब्ध

datta jadhav

प्रभावी लसीसाठी भारत प्रयत्नशील

Patil_p
error: Content is protected !!