तरुण भारत

गवतही न उगवणाऱया भूमीत सहस्रावधी वृक्ष

निसर्गाचा बिघडलेला समतोल पुन्हा साध्य करावयाचा असेल तर मोठय़ा प्रमाणावर वृक्षारोपण केले पाहिजे, अशी भाषा आपण नेहमी ऐकतो. सरकारी पातळीवर तसेच स्वयंसेवी संस्थांकडूनही वृक्षारोपणाचे कार्यक्रम दरवषी यांत्रिकपणे योजिले जात असल्याचे आपण पाहतो. वृक्षारोपणाच्या कार्यक्रमात लावलेल्या झाडांचे नंतर काय होते, याची कोणीही फारशी चिंता करत नाही.

बुंदेलखंड हा उत्तर प्रदेश आणि मध्यप्रदेश या राज्यांमधील दुष्काळग्रस्त भाग म्हणून ओळखला जातो. येथे वारेमाप वृक्षतोड गेली अनेक दशके झाल्याने एकेकाळी सुपीक असणारा हा भाग आता रखरखीत बनला आहे. या भागातील मानेगाव व धुमरिया येथील रहिवाशांनी आपले नैसर्गिक गतवैभव पुन्हा मिळविण्याच्या दृष्टीने गेली कित्येक वर्षे वृक्षारोपणाचा उपक्रम हाती घेतला आहे. ज्या भूमीत गेली कित्येक वर्षे गवताचे पातेही उगवले नव्हते तेथे  या ग्रामस्थांनी आज 60 हजारहून अधिक वृक्ष लावून ते जगविले आहेत. ग्रामस्थांना या कामात इंडियन फार्म फॉरेस्ट्री डेव्हलपमेंट को-ऑप. या संस्थेचे सहकार्य मिळाले आहे. ही संस्था भारत आणि कॅनडा यांनी संयुक्तरीत्या स्थापन केली आहे. 1998 ते 2001 या कालावधीत हे वृक्ष लावण्यात आले. नंतर ग्रामस्थांनी डोळय़ात तेल घालून त्यांची जपणूक गेली वीस वर्षे केली आहे. त्यामुळे हे मानवनिर्मित वन आता ऐन भरात आले आहे. या वृक्षलागवडीमुळे या भागातील भूजलाची पातळी वाढल्याचा अनुभव आहे. तसेच नामशेष झाल्याची शक्मयता असणारे अनेक पक्षी आज पुन्हा दर्शन देत आहेत. वृक्षांमुळे हवेचे शुद्धीकरण होऊन त्याचाही फायदा ग्रामस्थांना होत असून श्वसनाचे विकार काही प्रमाणात कमी झाल्याचा त्यांचा अनुभव आहे. आता या वनाची सुरक्षा सरकारने आपल्या हाती घ्यावी, अशी त्यांची अपेक्षा आहे.

Advertisements

Related Stories

दहावी परीक्षेचा निकाल ऑगस्टच्या प्रारंभी

Patil_p

लिट्टी-चोखाचा मोदींनी घेतला आस्वाद

tarunbharat

दहावी, बारावी परीक्षांसाठी नियम शिथिल

Patil_p

विदेशी चलन साठ्य़ात घटच

Patil_p

नौदलतळांच्या 3 किमी परिघात ड्रोनवर बंदी

datta jadhav

डॉ. रत्नप्रिया मिसेस इंडियाच्या अंतिम फेरीत

tarunbharat
error: Content is protected !!