तरुण भारत

‘त्या’ कृषी अधिकाऱयाला सावंतवाडी तालुक्यात थारा नाही!

मनसेचा इशारा : कृषी अधिकाऱयांना निवेदन सादर

वार्ताहर / सावंतवाडी:

Advertisements

 सावंतवाडी येथील कृषी कार्यालयातील महिलांशी असभ्य वर्तन करणाऱया कृषी पर्यवेक्षक अधिकाऱयांवर योग्य ती कडक कारवाई केली जावी, अन्यथा त्या अधिकायाला तालुक्यात थारा देणार नाही. यापुढे सावंतवाडी तालुक्यात महिलांच्या बाबतीत असे होणारे कोणतेही गैरप्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. त्यांना मनसे स्टाईलने उत्तर दिले जाईल, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष आशिष सुभेदार यांनी दिला.

 दरम्यान, यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी अजित अडसुळे यांना मनसेच्यावतीने गुरुवारी निवेदन देण्यात आले. संबंधित अधिकाऱयांची या प्रकरणी चौकशी सुरू असून तो अधिकारी दोषी आढळल्यास त्यावर प्रशासकीय कारवाई केली जाईल, असे आश्वासन यावेळी कृषी अधिकारी अडसुळे यांनी दिले. गुरुवारी  मनसेच्यावतीने येथील उपविभागीय कृषी अधिकारी यांच्या कार्यालयात धडक दिली. यावेळी महाराष्ट्र राज्य एस.टी. कामगार सेना परिवहन जिल्हाध्यक्ष ऍड. राजू कासकर, सावंतवाडी शहरअध्यक्ष आशिष सुभेदार, संतोष भैरवकर, लक्ष्मीकांत हरमलकर, मंगेश वरक आदी उपस्थित होते. यावेळी सुभेदार यांनी कृषी विभागात कार्यरत असलेले कृषी पर्यवेक्षक दर्जाच्या अधिकाऱयांकडून तालुक्यातील कृषी सहाय्यक महिलांच्या बाबतीत असभ्य वर्तन केले जात आहे. यापूर्वी सदरील अधिकारी कणकवली, कुडाळ कृषी कार्यालयात कार्यरत असताना त्याने असेच प्रताप केले आहेत. त्याचीच पुनरावृत्ती आता सावंतवाडीत झाली असून अशा लंपट अधिकाऱयांना यापुढे सावंतवाडी तालुक्यात थारा देणार नाही. त्या अधिकाऱयावर कडक कारवाई केली जाईल, अन्यथा मनसे स्टाईल धडा शिकवला जाईल, असा इशारा दिला. दरम्यान, ऍड. राजू कासकर यांनी तो वाद्ग्रस्त अधिकारी यापुढे तालुक्यात येता कामा नये, याची जबाबदारी अधिकाऱयांची आहे. त्या अधिकायाच्या अगोदरच्या घटना पहिल्या असता अशा आधिकारी व कर्मचाऱयांवर कडक कारवाई झाली पाहिजे, असे सांगितले.  यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी अजित अडसुळे यांनी आपण रजेवरून आल्यानंतर प्रथम या प्रकरणाची तातडीने दखल घेतली. त्यानंतर महिलांना बोलावून वस्तुस्थिती जाणून घेतली. यावेळी त्यानी संबंधित अधिकाऱयांसोबत आम्हाला काम करायचं नाही, त्याची बदली केली जावी, अशी मागणी केली आहे. तक्रारदारांचे जबाब नोंदवून घेण्यात आले असून या प्रकरणाची प्रशासकीय पातळीवर चौकशी सुरू आहे. प्रशासकीय कार्यवाहीला थोडा विलंब होईल. मात्र, तोपर्यंत त्या अधिकाऱयाला ओरोस जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयात बदलीवर पाठवण्यात आले आहे. त्यामुळे आता महिलांची काही तक्रार राहिलेली नाही. परंतु तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी सुरू केली आहे. संबंधित महिलाचे जाबजबाब घेतले आहेत. त्या कृषी पर्यवेक्षकांची कुडाळ येथे ऑर्डर झालेली आहे. या प्रकरणाची जोपर्यंत पूर्ण चौकशी होत नाही, तोपर्यंत त्यांना ओरोस जिल्हा कृषी कार्यालयातच ठेवले जाणार आहे. त्याने ज्या काही घटना व प्रताप अन्य तालुक्यात केले आहेत, त्या बद्दल अद्याप रितसर तक्रारी झाल्या नाहीत. मात्र, या प्रकरणात निश्चित कारवाई केली जाईल. संबंधित अधिकारी दोषी आढळल्यास त्यावर निलंबनाची तसेच बदलीची कारवाई केली जाईल, असे आश्वासन यावेळी अधिकारी अडसुळे यांनी दिले.

Related Stories

रत्नागिरी जिल्हय़ात आणखीन तीन रिपोर्ट पॉझिटीव्ह

Patil_p

‘सिव्हील’चे भूलतज्ञ, बालरोगतज्ञ पॉझीटीव्ह

Patil_p

कोकणातील कातळावर दुर्मिळ होत चाललेली शेती

Abhijeet Shinde

एलएनटी-शिवसेनेतील वाद तहसीलदारांच्या कोर्टात

Patil_p

प्राथमिक शिक्षकांच्या समस्या सोडवण्याची मागणी

Patil_p

शेतकऱ्यांनी भात पिकावरील रोगावर वेळीच फवारणी करावी

Ganeshprasad Gogate
error: Content is protected !!