तरुण भारत

मंत्रीही खरेदी करतात असे स्टेशनरी दुकान

दिल्लीत राजेंद्र टेडर्स नावाचे एक दुकान अतिशय लोकप्रिय आहे. 61 वर्षांपूर्वी या दुकानाचा प्रारंभ झाला. येथे स्टेशनरी आणि ब्रँडेड पेन्स व लेखण्या मिळतात. ज्या अतिशय प्रसिद्ध आहेत. या दुकानाच्या ग्राहकांमध्ये केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, उमा भारती, कपिल सिब्बल, नरेंद्र तोमर आणि पंतप्रधान कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱयांचा समावेश आहे. या दुकानात स्टेशनरीसंबंधित सर्व वस्तू एकाच छताखाली मिळतात. ब्रँडेड पेन्स ही या दुकानाची विशेषता आहे.

हे दुकान फाळणीच्यावेळी (1947-50) पाकिस्तानातून नेसत्या वस्त्रांनिशी भारतात आलेल्या सुभाष गोगिया यांनी सुरू केले होते. भारतात आल्यानंतर उपजिवीकेसाठी ते व्यवसायाच्या शोधात असताना त्यांना स्टेशनरी विक्रीची कल्पना सुचली. त्यानुसार त्यांनी 1960 मध्ये सुभाष पुस्तक भांडार सुरू केले. त्यावेळी दक्षिण दिल्लीत सर्व लोकप्रिय साहित्यिकांची पुस्तके मिळणारे हे एकमेव दुकान होते. त्यांचे पुत्र राजेंद्र यांनी नंतर दुकानाचे नाव बदलून राजेंद्र टेडर्स केले आणि पुस्तकांबरोबरच स्टेशनरी विकण्याचा व्यवसायही सुरू केला. आज या दुकानाचा विस्तार प्रचंड असून हजारो कायमस्वरुपी ग्राहक त्यांनी मिळविले आहेत. सध्या या दुकानाची मालकी सुभाष गोगिया यांचे नातू पुलकित गोगिया यांच्याकडे आहे. ब्रँडेड पेन हे या दुकानाचे वैशिष्टय़ असून दहा रुपयांपासून 5 हजार रुपयांपर्यंतची पेने एकाच ठिकाणी मिळण्याचे हे एकमेव दुकान मानले जाते.

Advertisements

Related Stories

आयसीएसई बोर्डाचा दहावी आणि बारावीचा निकाल उद्या

Rohan_P

‘या’ राज्याने मिळवला सर्वप्रथम पूर्ण लसीकरण करण्याचा मान!

Abhijeet Shinde

आता संसदेला घेराव; चार नव्हे चाळीस लाख ट्रॅक्टर येणार

datta jadhav

ऑक्सिजन पुरविणारी गादी

Patil_p

अमेरिका 8 देशांवरील प्रवासबंदी उठविणार

Patil_p

101 संरक्षण उपकरणांच्या आयातीवर बंदी

Patil_p
error: Content is protected !!