तरुण भारत

रावण दहन नव्हे रावण पूजन करणारे मंदिर

दसऱया दिवशी भारतात बहुतेक ठिकाणी रावण दहनाचा कार्यक्रम परंपरागतरीतीने आणि उत्साहात साजरा केला जातो. प्रभू रामचंद्रानी रावणाला अंत घडवून विजय मिळविल्याची स्मृती अशाप्रकारे जागृत ठेवली जाते. विशेषतः उत्तर भारतात आणि त्यातही उत्तर प्रदेशात रावण दहनाचे कार्यक्रम अतिशय लोकप्रिय आहेत. तथापि, याच उत्तर प्रदेशात रावणेश्वर धाम नावाचे एक धर्मस्थळ असून तेथे दसऱया दिवशी रावणाचे दहन नव्हे तर रावणाचे पूजन केले जाते.

रावण हा रामाचा शत्रू असला तरी तो भगवान शंकराचा महान भक्त होता. बारा ज्योतिर्लिंगांपैकी वैद्यनाथ धाम येथील शिवलिंगाची स्थापना रावणानेच केली होती, अशी मान्यता आहे. येथे भगवान शंकरांना रावणेश्वर महादेव या नावाने ओळखले जाते. याच स्थानी दसऱया दिवशी रावणाची पूजा करण्याची पद्धत आहे. या मंदिराचे प्रमुख पुजारी राहिलेले भवप्रितानंद ओझा यांनी रावणाची स्तुती करणारी अनेक कवने रचली आहेत. रावणामुळेच शंकर भगवानांची येथे स्थापना होऊ शकली, अशी परिसरातील लोकांची श्रद्धा आहे. त्यामुळे ते मोठय़ा संख्येने रावणाच्या पूजेच्या कार्यक्रमात सहभागी होतात. रावण हा महान पंडित होता. त्याच्या दुर्गुणांची चर्चा नेहमी केली जाते. तथापि, त्याच्यातील सत्वगुणांचा सन्मान आम्ही करतो, असे या परिसरातील लोकांचे म्हणणे आहे.

Advertisements

Related Stories

वैराग ग्रामपंचायत कार्यालयात रंगली दारू पार्टी

Abhijeet Shinde

यूपीएससीचा निकाल जाहीर; प्रदीप सिंह देशात अव्वल

Rohan_P

कुशल तरुणाई देशासाठी आवश्यक

Amit Kulkarni

नाशिकने उठवलेलं वादळ अजून शमलेलं नाही: संजय राऊत

Abhijeet Shinde

तपासातील उत्तम कामगिरीसाठी १५२ पोलीस अधिकाऱ्यांना पदक जाहीर

Amit Kulkarni

देशातील दोन राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील सर्व पात्र नागरिकांना मिळाली लस

Abhijeet Shinde
error: Content is protected !!