तरुण भारत

वर्क फ्रॉम होममुळे पाठीचे आजार

गेल्या पावणे दोन वर्षात कोरोनाच्या दोन उदेकांमुळे अनेकांना घरातूनच काम करण्याची मुभा देण्यात आली आहे. तथापि, यामुळे काही नव्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. घरामध्ये कर्मचाऱयांना बसण्यासाठी शास्त्रशुद्ध पद्धतीची आसने असत नाहीत. त्यामुळे उपलब्ध आसने किंवा खुर्च्यांवर बसून कर्मचारी तासन् तास संगणकावर कार्यालयीन कामे करतात. त्यामुळे अनेक कर्मचाऱयांना तरुणवयातच स्पाँडिलायटीस आणि पाठीचे इतर विकार जडल्याचे दिसून येते.

कामात मग्न झाल्यानंतर आपण कशाप्रकारे बसलो आहोत, याकडे कर्मचाऱयांचे दुर्लक्ष होते. यामुळे पाठीचे स्नायू दुखावले गेल्याचेही त्यांच्या लक्षात येत नाही. कालांतराने या स्नायूंमधील शक्ती कमी होऊन त्यांची झीज (ऍट्रीशन) होते. पाठीच्या कण्यांमधील अंतर वाढल्याने स्पाँडिलायटीसचा त्रास सुरू होतो. एकदा हा त्रास सुरू झाल्यानंतर पाठ पूर्वस्थितीत येण्यासाठी बराच काळ उपचार घ्यावे लागतात आणि त्रास सहन करावा लागतो. तज्ञांनी या समस्येवर एक अतिशय सोपा उपाय सांगितला आहे. एक तासातील 54 मिनिटे बसून काम करावे आणि 6 मिनिटे ताठपणे खोलीतल्या खोलीत चालावे, असा हा उपाय आहे. यामुळे एकाच स्थितीत पाठीचे स्नायू न राहिल्याने त्यांच्यातील शक्ती टिकून राहते. तसेच पाठीच्या कण्यालाही योग्य तो व्यायाम मिळून स्पाँडिलायटीस सारख्या विकाराचे बळी होण्याचे वेळ येत नाही. याशिवाय दिवसात पंधरा मिनिटे तरी पाठीची योगासने करावीत, असा सल्ला तज्ञांनी अशा कर्मचाऱयांना दिला आहे.

Advertisements

Related Stories

ट्रकमधून घुसखोरीचा प्रयत्न उधळला

Patil_p

दिल्ली : कीर्ती नगरमधील फर्निचर मार्केटला आग

Rohan_P

गुजरातमधील ‘या’ शहरात 21 मे पर्यंत कर्फ्यू

Rohan_P

Maharashtra HSC Result 2021: बारावीच्या निकालासाठी मूल्यमापन पद्धत जाहीर

Abhijeet Shinde

नवाज शरीफ यांच्या जावयाला अटक

datta jadhav

…तर देशातील रूग्णसंख्या 36ते 70 लाखांवर गेली असती

Patil_p
error: Content is protected !!