तरुण भारत

गुजरात उच्च न्यायालयाच्या सात न्यायाधीशांचा शपथविधी

अहमदाबाद / वृत्तसंस्था

गुजरात उच्च न्यायालयाच्या सात नवनियुक्त न्यायाधीशांनी शपथग्रहण केले आहे. त्यांना राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. मौना मनीष भट्ट, मनीष ज्योतिंद्रप्रसाद दवे, हेमंत महेशचंद्र प्रच्छक, संदीप नवरतलाल भट्ट, अनिरुद्ध प्रद्युन्म मये, निराल रश्मीकांत मेहता आणि निशा महेंद्रभाई ठाकोर अशी नवनियुक्त न्यायाधीशांची नावे आहेत.

Advertisements

हे सातही जण न्यायाधीश होण्याअगोदर वकील होते. त्यांना गेल्या शनिवारी न्यायाधीशपदी पदोन्नती देण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायवृंदाने त्यांच्या नावांची सूचना केली होती. शपथविधी कार्यक्रमाला मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, कायदा मंत्री राजेंद्र त्रिवेदी, ऍडव्होकेट जनरल कमल त्रिवेदी, ऍडिशनल सॉलिसिटर जनरल एस. व्ही. राजू आणि गुजरात उच्च न्यायालयाचे अनेक ज्येष्ठ न्यायमूर्ती उपस्थित होते. गुजरात उच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्या. विक्रम नाथ आणि न्या. बेला त्रिवेदी यांना सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून पदोन्नती मिळाल्यानंतर या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. त्यामुळे गुजरात उच्च न्यायालयात न्यायाधीशांची संख्या आता 32 झाली आहे. या उच्च न्यायालयात एकंदर न्यायाधीशांची संख्या 52 आहे. त्यामुळे अद्यापही 20 पदे रिक्त आहेत.

Related Stories

पायलटला ह्रदयविकाराचा झटका; बांग्लादेशच्या विमानाचे नागपुरात लँडींग

Rohan_P

डिसेंबरपर्यंत भारताला मिळणार एस-400

Patil_p

‘राष्ट्रीय बाल शक्ती’ने 32 मुलांचा गौरव

Patil_p

कोरोनाबाधितांचा आकडा 4 हजार पार

Patil_p

तीन दिवसांत राज्यात 101 रुग्णांची भर

Patil_p

‘एलआयसी’ कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर

Patil_p
error: Content is protected !!