तरुण भारत

कोलिन पॉवेल यांचे निधन

वॉशिंग्टन / वृत्तसंस्था

अमेरिकेचे माजी परराष्ट्र व्यवहार मंत्री कोलिन पॉवेल यांचे कोरोना संसर्गामुळे निर्माण झालेल्या समस्यांमुळे निधन झाले, असे त्यांच्या कुटुंबियांनी स्पष्ट केले आहे. ते 84 वर्षांचे होते. 1989 मध्ये ते अमेरिकेच्या तीन्ही सेनांचे प्रथम ‘काळे’ प्रमुख बनले. त्यांनी अमेरिकेचे पनामावरील आक्रमण आणि इराकच्या तावडीतून कुवेतची सोडवणूक या मोहिमा यशस्वी करुन दाखविल्या. नंतर जॉर्ज बुश (धाकटे) यांच्या काळात ते अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री बनले.

Advertisements

मात्र, याच काळात इराकवरील अमेरिकेच्या दुसऱया आक्रमणामुळे ते वादग्रस्तही झाले होते. इराकने गुप्तपणे रासायनिक शस्त्रे मिळविली असल्याची चुकीची माहिती त्यांनी संयुक्त राष्ट्रसंघाला दिली आणि इराकवर आक्रमण करण्याचा अधिकार अमेरिकेला मिळवून दिला. मात्र, नंतर इराकजवळ अशा प्रकारची महासंहार घडवून आणणारी शस्त्रे नसल्याचे स्प़ष्ट झाल्याने त्यांच्यावर जोरदार टीकाही झाली होती. त्यांच्या निधनामुळे अमेरिकेने एक द्रष्टा आणि कष्टाळू नेता गमावला अशी प्रतिक्रिया अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश (धाकटे) यांनी व्यक्त केली आहे.

Related Stories

संसद बरखास्त केल्यामुळे नेपाळ सरकारला कारणे दाखवा नोटीस

datta jadhav

आशियाई लोकांबद्दल बायडेन यांचा महत्त्वाचा निर्णय

Patil_p

रशियाचे सुपरफास्ट ‘सोयुझ एमएस -17’ तीन तासात पोहचणार आयएसएसवर

datta jadhav

डोंगराळ भागातील लढाईसाठी भारताकडे सर्वात मोठी आणि अनुभवी सेना; चिनी लष्करी तज्ज्ञांचा दावा

Rohan_P

‘परग्रहवासीयां’च्या पाऊलखुणांचा शोध घेतोय अमेरिका 1947 युएफओ क्रॅश

Patil_p

अमेरिकेत फायजरच्या कोरोना लसीला मंजुरी

Patil_p
error: Content is protected !!