तरुण भारत

चीनच्या अर्थव्यवस्था होतेय कमजोर

तिमाही विकासदर एक वर्षाच्या नीचांकी पातळीवर

बिजींग / वृत्तसंस्था

Advertisements

कोरोना उद्रेकाचा जगाच्या अर्थव्यवस्थेला जसा फटका बसला आहे, तसा चीनच्याही अर्थव्यवस्थेला बसताना दिसत आहे. विद्यमान वित्तवर्षाच्या तिसऱया तिमाहीत चीनचा विकासदर घसरुन 4.9 टक्के झाला आहे. पहिल्या तिमाहीत हाच दर 18.3 टक्के होता. मालमत्ता कर्जांमध्ये बँकांना बसलेला फटका, ऊर्जा विभागावरील सरकारी निर्बंध आणि कोरोना परिस्थिती यामुळे हा फटका बसला.

चीनमध्ये जगाच्या तुलनेत कोरोना परिस्थिती लवकर आटोक्यात आली होती. त्यामुळे या वित्त वर्षाच्या पहिल्या काही महिन्यांमध्ये चीनी अर्थव्यवस्थेने जोरदार प्रगती दाखविली होती. तथापि दुसऱया तिमाहीच्या उत्तरार्धात बँकांना फटका बसला. तसेच वीजेच्या उत्पादनात मोठा खंड पडला. त्यामुळे वीज कपातीचे संकट उभे राहिले. त्यातच ग्राहकांकडून मागणी कमी झाल्याने अर्थव्यवस्थेचा वेग मंदावला. दुसऱया तिमाहीत विकासदर 7.9 टक्के होता. तिसऱया तिमाहीत त्याची मोठय़ा प्रमाणात घसरण झाली आहे. जागतिक मंदीचा परिणाम चीनच्या अर्थव्यवस्थेवर होत आहे, अशी प्रतिक्रिया चीनच्या अर्थतज्ञांनी या घसरणीवर दिली आहे.

सुधारणा अस्थिर

देशांतर्गत आर्थिक मंदीतून चीनची अर्थव्यवस्था पहिल्या तिमाहीत सावरली होती. तथापी अर्थव्यवस्थेत होत असलेली सुधारणा अस्थिर होती. ग्राहकोपयोगी वस्तूंच्या मागणीत पाहिल्या तीन तिमाहींमध्ये सरासरी 16.5 टक्क्यांची वाढ दिसून आली होती. तरीही अर्थव्यवस्था अद्याप अस्थिरच असून तिसऱया तिमाहीत मागणीत घट झाल्याने चौथ्या तिमाहीतील आर्थिक विकासदरावरही याचा परिणाम होणार असल्याचे मत चीनी तज्ञ व्यक्त करीत आहेत.

Related Stories

हल्ल्यांमुळे न्यूयॉर्कमध्ये दहशत, सुरक्षेत वाढ

Patil_p

भारतीय सीमेजवळ चीनने उभारली 500 ‘मॉडेल व्हिलेज’

datta jadhav

मेक्सिकोत कोरोनाबळींच्या संख्येने गाठला 1.10 लाखांचा टप्पा

datta jadhav

एका चुकीमुळे गमावले 17 लाख फॉलोअर्स

Patil_p

इटलीचे शहर ‘वो’ जगासाठी आशेचा किरण

tarunbharat

मित्रदेशांचे रक्षण करणे कर्तव्य!

Patil_p
error: Content is protected !!