तरुण भारत

सरदार पटेल यांच्यासंदर्भात पुन्हा भाजप-काँगेस यांच्यात खडाजंगी

काँगेस कार्यकारिणी बैठकीतील वक्तव्यावर भाजपची टीका

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

Advertisements

सरदार वल्लभभाई पटेल संपूर्ण काश्मीर संस्थान पाकिस्तानला देणार होते, असे वक्तव्य काँगेस नेते तारिक हमीद कर्रा यांनी नुकत्याच पार पडलेल्या काँगेस कार्यकारिणी बैठकीत केले आहे. या वक्तव्यावर भाजपने कडाडून टीका केली असून कर्रा यांच्यावर काँगेस कोणती कारवाई करणार असा प्रश्न विचारला आहे.

सरदार पटेल यांनी संपूर्ण काश्मीर पाकिस्तानचे आहे असे म्हटले होते. त्यामुळे काश्मीरसंबंधीचे अधिकार पटेल यांच्याकडे देण्यात आले असते तर त्यांनी पूर्ण काश्मीर संस्थान पाकिस्तानला दिले असते. मात्र नेहरुंमुळे काश्मीर भारताला मिळाले, असे विधान कर्रा यांनी कार्यकारिणी बैठकीत बोलताना केले होते.

भाजपचे प्रवक्ते संबीत पात्रा यांनी या विधानासंबंधी काँग्रेसने भूमिका स्पष्ट करावी असे आवाहन केले आहे. कर्रा यांनी सरदार पटेलांच्या राजकीय दूरदृष्टीविषयी शंका उपस्थित केली आहे. ज्यांनी संपूर्ण भारत एकत्र केला त्या सरदार पटेलांनी पाकिस्तानाला दिले असते असे विधान करणे हा पटेलांचा अवमान आहे. पटेल यांना खलनायक ठरविण्याचा हा प्रयत्न आहे. आता असा त्यांचा अवमान करणाऱया कर्रा यांच्या विरोधात काँगेस कोणती कारवाई करणार, याकडे देशाचे लक्ष लागून राहिले आहे. काँग्रेस पक्ष कर्रा यांच्या विधानाचे समर्थन करीत असेल तर तसे त्या पक्षाने स्पष्ट करावे, असे प्रतिपादन पात्रा यांनी केले.

Related Stories

दिल्ली : आंदोलनात वृद्ध शेतकऱ्याचा मृत्यू; मृतांची संख्या 10 वर

datta jadhav

देशातील दैनंदिन रुग्णसंख्येत वाढ

datta jadhav

कोरोनाविरोधी लढय़ात अंबानींचे दिलदार पाऊल; कर्मचाऱयांना दुप्पट वेतन

tarunbharat

बाळासाहेब ठाकरे आजही लाखों लोकांसाठी प्रेरणादायीच : नरेंद्र मोदी

prashant_c

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे निधन

datta jadhav

अधीर रंजन यांच्याकडून केंद्राच्या कामगिरीचे कौतुक

Patil_p
error: Content is protected !!