तरुण भारत

डेराप्रमुख राम रहीमला जन्मठेप, 31 लाख दंड

रणजित सिंह हत्याप्रकरणी अन्य चौघांनाही आजीवन कारावास

पंचकुला  / वृत्तसंस्था

Advertisements

एकोणीस वर्षापूर्वी घडलेल्या डेराचे माजी व्यवस्थापक रणजित सिंह हत्या प्रकरणात पंचकुलाच्या विशेष सीबीआय न्यायालयाने सोमवारी डेराप्रमुख गुरमीत राम रहीमसह पाच दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तसेच राम रहीमला 31 लाखांचा तर इतर चार दोषींना प्रत्येकी 50 हजार रुपयांचा दंड ठोठावला. न्यायालयाने सुनावलेल्या दंडापैकी निम्मी रक्कम पीडित कुटुंबाला दिली जाणार आहे. दरम्यान, या निर्णयाविरोधात राम रहीम उच्च न्यायालयात दाद मागणार आहे. जसबीर, अवतार, कृष्णलाल आणि सबदिल अशी अन्य आरोपींची नावे आहेत.

10 जुलै 2002 रोजी रणजीत सिंह यांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपविल्यानंतर संपूर्ण प्रकरण केवळ विशेष सीबीआय न्यायालयात चालले. या घटनेला 19 वर्षे उलटल्यानंतर या महिन्याच्या सुरुवातीला राम रहीमसह पाच जणांना दोषी ठरवण्यात आले होते. या प्रकरणाची संपूर्ण सुनावणी 12 ऑगस्ट रोजी पूर्ण झाली होती. सुनावणीदरम्यान सीबीआयने न्यायालयाकडे डेरा प्रमुखांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली होती. त्याचवेळी, राम रहीमने स्वतः व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे रोहतक तुरुंगातून दयेची विनंती केली होती. दोन अनुयायांवर बलात्कार केल्याप्रकरणी राम रहीम 20 वर्षांची शिक्षा भोगत आहे. दरम्यान आता पुन्हा त्याला हत्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

संपूर्ण हरियाणात कडक बंदोबस्त

शिक्षा घोषित करण्यापूर्वी सुरक्षा व्यवस्था कडक करत हरियाणाच्या पंचकुला जिह्यात कलम 144 लागू करण्यात आले आहे. राम रहीमशी संबंधित कोणत्याही प्रकरणात शिक्षा घोषित करण्यापूर्वी सुरक्षा यंत्रणा वाढवली जाते. 2017 मध्ये बलात्कार प्रकरणात राम रहीमला दोषी ठरवल्यानंतर हिंसाचारात 36 जणांचा मृत्यू झाला होता. त्यामुळेच सुरक्षेच्या बाबतीत आधीच सतर्कता बाळगण्यात आली.

Related Stories

रामलल्लाच्या आरतीत भाविक होणार सामील

Patil_p

कमलनाथांनी गमावला प्रमुख प्रचारकाचा दर्जा

Patil_p

सांबामध्ये दिसले 4 संशयित; शोधमोहीम सुरू

datta jadhav

मुख्यमंत्री बोम्माईंनी डीके प्रशासनाला दिला १० दिवसांचा अल्टिमेट

Abhijeet Shinde

लाचखोरीविरोधात भाषण, तासाभरातच झाली अटक

Patil_p

सीमाभागात बारकाईने लक्ष ठेवणार ‘भारत’ ड्रोन

datta jadhav
error: Content is protected !!