तरुण भारत

एटीपी मानांकनात फेडरर टॉप-10 मधून बाहेर

वृत्त संस्था/ पॅरीस

सोमवारी घोषित करण्यात आलेल्या ताज्या एटीपी मानांकन यादीत स्वीसचा अनुभवी टेनिसपटू तसेच 20 ग्रॅण्ड स्लॅम अजिंक्यपदे मिळविणारा 40 वर्षीय रॉजर फेडररला टॉप-10 मधून बाहेर फेकला गेला आहे. या यादीत फेडरर सध्या 11 व्या स्थानावर आहे. त्याचे स्थान दोन अंकानी घसरले.

Advertisements

40 वर्षीय फेडररला 500 मानांकन गुण गमवावे लागल्याने त्याला एटीपीच्या ताज्या मानांकन यादीत 11 व्या स्थानावर समाधान मानावे लागले. फेडररच्या खात्यावर 3285 मानांकन गुण आहेत.

गेल्या ऑगस्ट महिन्यात फेडररने आपल्याला यापुढे काही महिन्यांसाठी आपण टेनिसपासून अलिप्त राहणार असल्याचे घोषित केले होते. गेल्या जुलैमध्ये झालेल्या विंबल्डन स्पर्धेत त्याने आपला शेवटचा सहभाग दर्शविला. त्यानंतर त्याला गुडघ्याची शस्त्रक्रिया करुन घ्यावी लागली. 2020 फेब्रुवारीत आणि मे महिन्यात फेडररच्या उजव्या पायाच्या गुडघ्यावर दोनवेळा शस्त्रक्रिया करण्यात आली होती.

एटीपी मानांकन यादीत पोलंडचा हुरकेझने पहिल्या दहा टेनिसपटूमध्ये स्थान मिळविले आहे. एटीपीच्या मानांकन यादीत पहिल्या दहा टेनिसपटूंमध्ये स्थान मिळविणारा हुरकेझ हा पोलंडचा दुसरा टेनिसपटू आहे. इलाईट गटात प्रवेश करणारा हुरकेझ हा 174 वा टेनिसपटू आहे. त्याचप्रमाणे नॉर्वेच्या कास्पर रूडने इलाईट गटात स्थान मिळविले आहे.

 इंडियन वेल्समधील एटीपी टेनिस स्पर्धा जिंकणारा ब्रिटनचा कॅमेरून नुरीने या ताज्या मानांकन यादीत पंधराव्या स्थानावर झेप घेतली. त्याचे स्थान 11 अंकांनी वधारले आहे. इंडियन वेल्समधील बीएनपी पेरीबस खुली पुरूषांची टेनिस स्पर्धा जिंकणारा नुरी हा ब्रिटनचा पहिला टेनिसपटू आहे. इंडियन वेल्समधील या स्पर्धेत यापूर्वी ब्रिटनच्या अँडी मरेने 2009 साली, टीम हेनमनने 2002 आणि 2004 साली तसेच रूडेस्कीने 1998 साली अंतिम फेरी गाठली होती. 26 वर्षीय नुरीचे हे एटीपी मास्टर्स 1000 स्पर्धेतील पहिले विजेतेपद आहे.

Related Stories

बांगलादेशचा विंडीजवर वनडे मालिका विजय

Patil_p

अंशूला रौप्य तर सरिताला कांस्यपदक

Patil_p

घरी थांबणे हाच लढण्याचा सर्वोत्तम मार्ग

Patil_p

डब्ल्यूव्ही रमण यांची बीसीसीआयकडे तक्रार

Patil_p

फिनलंडचा डेन्मार्कवर विजय

Patil_p

धोनीच्या षटकाराकरिता होणार ‘त्या’ खुर्चीचा सन्मान!

Patil_p
error: Content is protected !!