तरुण भारत

इंडियन वेल्स स्पर्धेत ब्रिटनचा नुरी विजेता

वृत्त संस्था/ इंडियन वेल्स

ब्रिटनच्या 26 वर्षीय कॅमेरून नुरीने रविवारी येथे एटीपी मास्टर्स 1000 बीएनपी पेरीबस खुल्या पुरूषांच्या टेनिस स्पर्धेचे अजिंक्यपद पटकाविताना  अंतिम सामन्यात बॅसिलासेव्हेलीचा पराभव केला.

Advertisements

या स्पर्धेतील रविवारी झालेल्या पुरूष एकेरीच्या अंतिम सामन्यात ब्रिटनच्या नुरीने निकोलाझ बॅसिलासेव्हेलीचा 3-6, 6-4, 6-1 अशा सेट्समध्ये पराभव केला. 2021 टेनिस हंगामातील नुरीचे एटीपी टूरवरील हे दुसरे विजेतेपद आहे. या अंतिम सामन्यात नुरीने पहिला सेट गमविल्यानंतर त्यानंतर दोन सेट्समध्ये अचूक सर्व्हिस तसेच बेसलाईन खेळावर अधिक भर देत अजिंक्यपद मिळविले. एटीपी मास्टर्स 1000 टेनिस स्पर्धेत 2021 टेनिस हंगामात एटीपी मानांकनातील पहिल्या 25 टेनिसपटूंमध्ये स्थान नसणाऱया खेळाडूंनी अंतिम फेरीत प्रवेश मिळविला होता. या स्पर्धेत नुरीने अंतिम फेरीपर्यंत मजल मारताना सँडग्रेन, ऍग्युट, टॉमी पॉल, श्वार्त्झमन, दिमित्रोव्ह यांचा पराभव केला.

Related Stories

ऑस्ट्रेलिया की न्यूझीलंड? फैसला आज!

Patil_p

9 एप्रिलला आयपीएलची सुरुवात

Patil_p

रोहित शर्माला वगळल्याचे गूढ!

Patil_p

आयपीएल स्पर्धेसाठी इंग्लंडचे खेळाडू उपलब्ध होण्याची शक्यता कमी

Patil_p

फॉर्म गवसलेल्या चेन्नईसमोर कार्तिकच्या नेतृत्वाची कसोटी

Patil_p

पीव्ही सिंधूची जेतेपदाकडे वाटचाल

Patil_p
error: Content is protected !!