तरुण भारत

इंडोनेशियाकडे थॉमस तर जपानकडे उबेर चषक

वृत्त संस्था/ आर्हस (डेन्मार्क)

रविवारी येथे झालेल्या विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या सांघिक पुरूष आणि महिलांच्या बॅडमिंटन स्पर्धेत इंडोनेशियाने पुरूष विभागातील थॉमस चषक पटकाविला तर महिलांच्या विभागात बलाढय़ चीनने जपानचा पराभव करत उबेर चषकावर आपले नाव कोरले. इंडोनेशियाने अंतिम लढतीत चीनचे आव्हान मोडीत काढत तब्बल 19 वर्षांनंतर थॉमस चषक पटकाविला.

Advertisements

पुरूषांच्या सांघिक गटातील थॉमस चषकासाठी झालेल्या अंतिम लढतीत इंडोनेशियाने चीनचा 3-0 अशा फरकाने एकतर्फी पराभव केला. इंडोनेशियाने यापूर्वी म्हणजे 2002 साली थॉमस चषक जिंकला होता.

रविवारी झालेल्या अंतिम लढतीतील पुरूषांच्या पहिल्या एकेरी सामन्यात इंडोनेशियाच्या अँथोनी सिनीसुका जिंटीगने चीनच्या लु गुआंगझुचा 18-21, 21-14, 21-16 अशा गेम्स्मध्ये पराभव करत आपल्या संघाला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर पुरूष दुहेरीच्या सामन्यात इंडोनेशियाच्या अलफियान-मोहम्मद रियान आर्दियांतो यांनी चीनच्या जिंटींगöहेओडाँग यांचा 21-12, 21-19 असा पराभव केल्याने इंडोनेशियाने चीनवर 2-0 अशी आघाडी मिळविली. त्यानंतर परतीच्या एकेरी सामन्यात इंडोनेशियाच्या जोनातेन ख्रिस्टीने चीनच्या शिफेंगचे आव्हान 21-14, 18-21, 21-14 असे संपुष्टात आणले.

चीनकडे उबेर चषक

महिलांच्या सांघिक स्पर्धेतील अंतिम लढतीत चीनने जपानचा 3-1 अशा फरकाने पराभव करत उबेर चषकावर आपले नाव कोरले. ही स्पर्धा जिंकण्याची त्यांची 15 वी वेळ आहे. सांघिक बॅडमिंटन स्पर्धेतील चीनचा हा नवा इतिहास नोंदविला गेला आहे.

चीन-जपान अंतिम लढतीतील पहिल्या एकेरी सामन्यात जपानच्या यमागुचीने ऑलिम्पिक चॅम्पियन चेन युफेईचा 21-18, 21-10 अशा गेम्समध्ये पराभव केला. अलिकडेच झालेल्या सुदीरमन चषक मिश्र सांघिक बॅडमिंटन स्पर्धेतील अंतिम लढतीत जपानच्या येमागुचीने चीनच्या युफेईचा पराभव केला होता.

महिला दुहेरीच्या सामन्यात चीनच्या क्विंगचेन आणि इफेन या जोडीने जपानच्या फुकुसिमा आणि मात्सुमोटो यांचा 29-27, 21-18 असा पराभव करत चीनला बरोबरी साधून दिली. महिला एकेरीच्या परतीच्या सामन्यात चीनच्या बिंगजियाओने जपानच्या ताकाशीचा 21-9, 21-18 असा पराभव करत चीनला 2-1 अशी आघाडी मिळवून दिली. शेवटच्या दुहेरीच्या सामन्यात चीनच्या हुवाँग आणि वेनमेई यांनी जपानच्या मात्सुटोमो आणि मात्सुयामा यांचा 24-22, 23-21 असा पराभव करत या स्पर्धेतील जपानचे आव्हान संपुष्टात आणले. या स्पर्धेमध्ये चीनने एकूण 15 सामने जिंकले असून जपानने 6 सामने जिंकले आहेत.

Related Stories

एल्गार, डी कॉक यांची अर्धशतके

Patil_p

ऑस्ट्रेलियन फुटबॉलपटूला कोरोनाची बाधा

Patil_p

विश्व टेटे संघटनेचे कर्मचारी स्वतःहून कमी वेतन घेणार

Patil_p

ब्रिटनचे माजी फुटबॉलपटू हंटर कोरोनाचे बळी

Patil_p

अव्वलमानांकित ज्योकोव्हिचची सलामीची लढत चार्डीशी

Patil_p

2022 युवा विश्व चषक क्रिकेट स्पर्धा पात्रता प्रक्रियेत बदल

Patil_p
error: Content is protected !!