तरुण भारत

समशेरबाजी स्पर्धेत भवानी देवी विजेती

वृत्त संस्था/ नवी दिल्ली

फ्रान्समध्ये झालेल्या चार्लीव्हिले राष्ट्रीय समशेरबाजी स्पर्धेत भारताची महिला खेळाडू भवानी देवीने सॅब्रे समशेरबाजी प्रकारात विजेतेपद पटकाविले.

Advertisements

भारताची 28 वर्षीय भवानी देवीने आपले प्रशिक्षक ख्रिस्टेन बॉर आणि स्कीनडेर यांचे आभार मानले आहे. टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत समशेरबाजी प्रकारामध्ये भारताची भवानी देवीने आपला सहभाग दर्शविताना टय़ुनेशियाच्या नादियाचा पराभव केला होता. त्यानंतर तिला फ्रान्सच्या कास्यपदक विजेत्या ब्रुनेटकडून पराभव पत्करावा लागला. जागतिक महिला समशेरबाजीच्या मानांकनात भवानी देवी सध्या 50 व्या स्थानावर आहे. 2022 साली होणाऱया आशियाई स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी भवानी देवी जोरदार सराव करीत आहे.

Related Stories

इंग्लंड-पाकिस्तान पहिली कसोटी आजपासून

Patil_p

विराट कोहलीने वाचवला कोरोनाग्रस्त क्रिकेटपटूच्या आईचा जीव; केली 6.77 लाखांची मदत

Rohan_P

पाकिस्तानचे पहिले पथक आज इंग्लंडला रवाना

Patil_p

कणखर लढा देण्यास विराटसेना सज्ज

Patil_p

ब्राझील, कोलंबिया उपांत्यपूर्व फेरीत

Amit Kulkarni

प्रेंच टेनिस स्पर्धा खरेदी तिकीटांचे पैसे देणार

Patil_p
error: Content is protected !!