तरुण भारत

आमदार शिवेंद्रराजेंचा शुभारंभ केव्हा?

शहरातील इच्छूकांमध्ये कमालीची उत्सुकता

विशाल कदम/ सातारा

Advertisements

खासदार उदयनराजेंनी शहरात व उपनगरात विविध विकास कामांच्या उद्घाटनांचा धडाका लावला आहे. नुकत्याच साताऱयात युवकांशी संवाद साधण्यासाठी इनोव्हेटीव्ह सातारा हा कार्यक्रम नुकताच पार पडला. या कार्यक्रमामध्ये युवकांची मने खासदार उदयनराजेंनी जिंकली आहेत. त्यांनी पालिका निवडणूकीच्या प्रचाराचा नारळच या माध्यमातून फोडला आहे. आता आमदार शिवेंद्रराजे यांच्याकडून साताऱयातील युवकांसाठी नेमका कोणत्या कार्यक्रमाचे आयोजन करुन प्रचाराचा श्रीगणेश करत आहेत. याकडे उत्सुकता लागून राहिली आहे.

सातारा पालिकेच्या विद्यमान नगरसेवकांची मुदत संपत आलेली आहे. नवीन निवडणूक ही मार्च पर्यंत होण्याची शक्यता आहे. डिसेंबर महिन्यात आचारसंहिता लागेल असे बोलले जात आहे. पालिकेवर सध्या खासदार उदयनराजे गटाची सत्ता आहे. गतनिवडणूकीत आमदार शिवेंद्रराजे गटाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमदेवार सौ. वेदांतिकाराजे भोसले यांच्यासाठी सुरुवातीपासून चांगले वातावरण होते. चांगला प्रतिसाद सातारकरांकडून होता. परंतु निवडणूकीच्या शेवटच्या कालावधीत खासदार उदयनराजेंनी भिरकीट लावली अन् त्यामध्येच साविआच्या बाजूने कौल लागला. आता तर अजून निवडणूकीला अवकाश असला तरीही सातारा विकास आघाडीचे प्रमुख म्हणून खासदार उदयनराजेंनी सातारा विकास आघाडीसाठी भिरकीट सुरु केली आहे. सातारा शहरातील उपनगरात उद्घाटनांचा धडाका लावला आहे. स्कूटरवरुनही नुकतीच त्यांनी रपेट लावली आहे. तर युवकांशी संवाद साधण्याकरता इनोव्हेटीव्ह नामक कार्यक्रमही घेतला गेला. त्याच्या माध्यमातून खासदार उदयनराजेंनी पालिकेच्या प्रचाराचा शुभारंभ केला गेला आहे. आमदार शिवेंद्रराजे यांच्याकडून पालिकेवर सातत्याने निशाणा साधला जातो. त्यांनीही उपनगरात अनेक ठिकाणी उद्घाटने, भूमिपूजने केली. त्यावेळी टीकाटीप्पणी केली. परंतु युवकांच्या मनामध्येही त्यांच्याबाबत एक वेगळी क्रेझ आहे. एक वेगळा दबदबा आहे. त्यामुळे ते साताऱयातील त्यांच्या युवावर्गाच्या चाहत्यासाठी नेमका काय आणि कसा कार्यक्रम घेणार त्यातून प्रचाराचा शुभारंभ करणार याकडे लक्ष लागून राहिले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसची व्युह रचना काय असेल

सातारा पालिका राष्ट्रवादी काँग्रेस लढवणार हे दीपक पवार, शशिकांत शिंदे आर्वजून सातत्याने सांगतात. अनेक जण संपर्कात आहेत असाही उल्लेख वारंवार करतात. परंतु अद्यापही त्यांच्याकडून साताऱयात सत्ताधाऱयांच्या व विरोधकांच्या विरोधात नेमकी भूमिका अद्याप स्पष्ट झाली नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची व्युहरचना कशी असेल याकडे लक्ष लागून राहिले आहे.

Related Stories

अनुकंपा भरतीबाबत चौकशीचे आदेश

Patil_p

प्रतापगड कारखाना सुरू न झाल्यास टाळे तोडू

datta jadhav

चुकीने ऑनलाईन ट्रान्सफर झालेले 35 हजार परत केले

Amit Kulkarni

सातारा जिल्ह्यात 1086 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; तर 35 नागरिकांचा मृत्यू

Abhijeet Shinde

येणकेतील बिबट्याला पकडण्यात वनविभागाला यश

datta jadhav

कोयना पोलिसांकडून अवैध दारू जप्त

datta jadhav
error: Content is protected !!