तरुण भारत

एनसीए अध्यक्षपदाला व्हीव्हीएस लक्ष्मणचा नकार

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

हैदराबादचा माजी दिग्गज फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मणने राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (एनसीए) अध्यक्षपदाची बीसीसीआयची ऑफर धुडकावून लावली. विद्यमान एनसीए अध्यक्ष राहुल द्रविड लवकरच भारतीय क्रिकेटच्या संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी रुजू होणार असल्याने ही जागा रिक्त होईल. त्या पार्श्वभूमीवर नियामक मंडळाने लक्ष्मणशी संपर्क साधला होता.

Advertisements

बीसीसीआय एनसीए अध्यक्षपदासाठी भारतीय क्रिकेटला देदीप्यमान योगदान देणाऱया इच्छुकाच्या शोधात आहे. लक्ष्मणने यापूर्वी बंगालमधील प्रथमश्रेणी क्रिकेटसटी फलंदाजी सल्लागार या नात्याने, तसेच आयपीएल स्पर्धेत सनरायजर्स हैदराबाद संघासाठी संघ प्रवर्तक या नात्याने जबाबदारी हाताळली आहे. याशिवाय, लक्ष्मणचा भारताच्या सर्वकालीन महान फलंदाजांमध्ये प्राधान्याने समावेश असून त्याने 134 सामन्यात 17 शतकांसह 8781 धावा फटकावल्या आहेत. साहजिकच, मंडळाने प्रथम त्याच्याशी संपर्क साधला. मात्र, त्याने हा प्रस्ताव फेटाळून लावला आहे.

तूर्तास, रवी शास्त्री यांची मुख्य प्रशिक्षकपदाची मुदत टी-20 विश्वचषक स्पर्धेनंतर संपत असून त्यांची जागा राहुल द्रविड घेईल आणि तोवर बीसीसीआय एनसीए अध्यक्षपदासाठी अन्य पर्यायांचा विचार करेल, असे चित्र आहे. यंदा टी-20 विश्वचषक स्पर्धेतील भारताची पहिली लढत पारंपरिक, कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध दि. 24 ऑक्टोबर रोजी होणार आहे. दि. 14 नोव्हेंबर रोजी स्पर्धेतील जेतेपदाचा फैसला होईल.

Related Stories

आयपीएलचा कालावधी कमी होईल : गांगुली यांचे संकेत

tarunbharat

टी-20 विश्वचषक स्पर्धेतून फर्ग्युसन बाहेर

Patil_p

बार्सिलोनाची लढत पीएसजी बरोबर

Patil_p

स्मिथविरुद्ध भारताच्या रणनीतीची आथरटनला उत्सुकता

Patil_p

नीरज चोप्रा, रवि दहिया, लोवलिनाची ‘खेलरत्न’साठी शिफारस

Patil_p

कोरियन गोल्फ स्पर्धेत पार्क केयुंग विजेती

Patil_p
error: Content is protected !!