तरुण भारत

डेन्मार्क बॅडमिंटन स्पर्धा आजपासून

ओडेन्से / वृत्तसंस्था

डबल ऑलिम्पिक पदकविजेती व विद्यमान वर्ल्ड चॅम्पियन पीव्ही सिंधू आजपासून सुरु होणाऱया डेन्मार्क ओपन वर्ल्ड टूर सुपर 1000 बॅडमिंटन स्पर्धेच्या माध्यमातून दमदार प्रदर्शन साकारण्यासाठी महत्त्वाकांक्षी असेल. टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्य जिंकणाऱया सिंधूने त्यापूर्वी भरगच्च स्पर्धांमुळे काही काळ विश्रांती घेतली होती.

Advertisements

लंडन ऑलिम्पिकमधील कांस्यजेती सायना नेहवाल देखील दुखापतीतून सावरल्यानंतर या स्पर्धेच्या माध्यमातून पुनरागमन करत आहे. मागील आठवडय़ात संपन्न झालेल्या उबेर चषक स्पर्धेदरम्यान सायनाला दुखापतीमुळे अचानक माघार घ्यावी लागली होती.

यंदा डेन्मार्क ओपन स्पर्धेत चौथ्या मानांकित सायनाची सलामी लढत तुर्कीच्या नेस्लिहान यिगितविरुद्ध होईल. त्या तुलनेत सायनासमोर जपानच्या ओहोरीचे कडवे आव्हान असणार आहे. 2016 रिओ ऑलिम्पिक रौप्यजेत्या सिंधूसमोर दुसऱया फेरीत थायलंडच्या बुसाननचे आव्हान असेल, अशी शक्यता आहे. चिराग शेट्टी व सात्विकसाईराज रणकिरेड्डी या जोडीकडूनही भारताला बऱयाच अपेक्षा असतील. या जोडीची सलामी लढत इंग्लंडच्या कॅलम हेमिंग-स्टीव्हन स्टॅलवूड यांच्याविरुद्ध होणार आहे.

Related Stories

तृतीयपंथीयांसाठी सरकारी नोकऱ्यांमध्ये १ टक्के जागा राखीव; कर्नाटक सरकारचा ऐतिहासिक निर्णय

Abhijeet Shinde

रवि दहियाच्या ऑलिम्पिक पदकाची ‘नहरी’ला प्रतीक्षा!

Patil_p

विदर्भच्या क्रिकेटपटूंचे विवाह लांबणीवर

Patil_p

होल्डर, कॅम्पबेल यांची अर्धशतके

Patil_p

अफगाणिस्तानमध्ये आत्मघाती स्फोट; जवळपास 43 जण जखमी

Rohan_P

सिंधू, दीपिका कुमारी, पूजा राणीचे धडाकेबाज विजय

Patil_p
error: Content is protected !!