तरुण भारत

राधिका रस्ता बनलाय खुले स्वच्छतागृह

सार्वजानिक स्वच्छतागृह आवश्यक

प्रतिनिधी/ सातारा

Advertisements

साताऱयातील राधिका रस्ता हा पूर्वीपासून तसा कमी वर्दळीचा होता. आता या रस्त्यालाही मोठी वर्दळ असते. मात्र, याच रस्त्यावर मार्केटयार्डातील मद्यपी रस्त्याच्या कडेला खुशाल लघुशंका करत उभे असतात तर त्यापुढे बसाप्पा पेठपासून पुढे ते बुधवार नाक्यापर्यंत रस्त्याच्या कडेला वाढलेल्या झुडपांसमोर साताऱयातील सुशिक्षित नागरिक खुलेआम लघुशंकेला उभे असतात. याचा त्रास नागरिकांना विशेषतः दुचाकीवरुन जाणाऱया महिलांना होत असून राधिका रस्त्यावर सार्वजनिक स्वच्छ असे स्वच्छतागृह उभारावे, अशी मागणी होत आहे.

खालचा रस्ता अन वरचा रस्ता हे दोन रस्ते सोडले की सातारा संपला असे असायचे मात्र त्यानंतर तिसरा रस्ता निर्माण झाला आणि राधिका टॉकीजला जाण्यासाठी सोयीस्कर मार्ग म्हणून या रस्त्याचे नामकरण राधिका रोड झाले. या रस्त्यावर खूप वनराई बहरलेली होती. आता वाढत्या इमारतींमुळे ती गायब झाली आहे. मात्र या रस्त्यावरील मार्केटयार्ड परिसरात असलेल्या दोन वाईन शॉपमुळे येथे चांगली गर्दी असते. काही मद्यपी भर रस्त्यावर पडलेले असतात. तर काही मद्यपी भान हरपल्यावर खुलेआम रस्त्याच्या कडेला लघुशंका करत असतात.

त्यानंतर पुढे राजतारा हॉटेलपर्यंत चांगल्या इमारती व बँक व विविध प्रकाराची कार्यालये, हॉस्पिटल्स झाली आहेत. त्यामुळे खूप वर्दळ वाढलेली आहे. मात्र या परिसरात सार्वजनिक स्वच्छतागृहाची आवश्यकता असताना ते होण्यासाठी कोणीही पुढाकार घेत नाही. त्यामुळे मग सातारा तालुका पोलीस ठाण्याच्या पुढे बसाप्पा पेठ चौक ते बुधवार नाका दरम्यान परिसर खुले स्वच्छतागृह बनलेला आहे.

रस्त्याच्या कडेला उभे राहून लघुशंका

राधिकारोडचे नाव बदलून सार्वजनिक सु सु केंद्र ठेवायच का ? कारण या रत्यावर तीन ते चार ठिकाणी अशा प्रकारे गाडी लावून सुशिक्षित नागरिक खुलेआम लघुशंका करतात. मात्र, त्यामुळे परिसरात घाणीचे साम्राज्य तर पसरतेच पण दुचाकी, चारचाकीतून जाणाऱया महिलांना हे ओंगळवाणे दर्शन पाहताना शरमेने मान खाली घालावी लागते. दोष कोणाला द्यायचा ज्यांना अर्जंट लघुशंका ल ागली त्यांना की स्वच्छतागृह न बांधणाऱया नगरपालिकेला.

महिला, युवतींची कुचंबना

हा रस्ता सातत्याने वर्दळीचा आहे. प्रतापसिंह शेती फार्महाऊस परिसरासमोर व त्याच्या कंपाऊंडनजिक खुली स्वच्छतागृहे निर्माण झालेली आहेत. त्यापुढे बारटक्के मार्केटच्या शेजारी सार्वजनिक ठिकाणी खुलेआम मोठया प्रमाणावर कचरा टाकला  जातो. तर काहींची खासगी ट्रक व इतर वाहने तिथे उभी असतात. त्या वाहनांच्या आडोशाने लघुशंकेस नागरिक जातात. मात्र, रस्त्याने प्रवास करणाऱया सभ्य नागरिकांसह महिलांना या प्रकाराचा त्रास होतो याकडे पालिकेने लक्ष देण्याची गरज महिलांनी व्यक्त केलीय.

Related Stories

सातारा : …अन्यथा जिल्हा परिषदेसमोर शिवसेना आंदोलन छेडणार

datta jadhav

खेड येथून दोन लाख रुपयांचे दागिने लंपास

Patil_p

यमकनमर्डी मतदारसंघात ग्रा. पं. साठी शांततेत मतदान

Patil_p

सातारा : शासनाने वेळोवेळी दिलेले नियमांचे पालन करुन नूतन वर्षाचे स्वागत करावे

Abhijeet Shinde

आंतरराज्य दुचाकी चोर गजाआड

Patil_p

सातारा : बोरगावचे कण्हेर पाटबंधारे कार्यालय बनले तळीरामांचा अड्डा

datta jadhav
error: Content is protected !!