तरुण भारत

साताऱ्याची भाजप दोन्ही राजेंशिवाय

विक्रम पावसकर यांचा वॉर्ड प्रभारींच्या बैठकीत निर्णय

प्रतिनिधी/ सातारा

Advertisements

भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी सातारा नगरपालिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून कामाला सुरुवात केली आहे. शहरातील सर्व 131 बुथवर बूथ कमिटी पूर्ण आहेत त्यांचे काम चालू आहे. त्यामुळे नगरपालिका निवडणूक भारतीय जनता पार्टी पूर्ण ताकतीने अन् कमळ या चिन्हावर लढेल, असा विश्वास भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी व्यक्त केला.

पालिकेच्या आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टीने प्रत्येक वॉर्डसाठी एका प्रभारीची नियुक्ती केली आहे. या प्रभारींनी आपल्या वॉर्डचा पूर्ण अभ्यास करून भारतीय जनता पार्टीच्या शहर कार्यकारिणीकडे अहवाल सादर करायचा आहे. त्या अनुषंगाने आयोजित बैठकीत ते बोलत होते.

विक्रम पावसकर पुढे म्हणाले, साताऱयात भाजपाचे सर्व प्रकारचे कार्यक्रम चांगल्या पद्धतीने राबवले जात असून निवडणुकीत पक्षाशी एकनिष्ठ राहून काम करावे. तिकीट मिळाले तर निवडून येण्यासाठी प्रयत्न करावेत तिकीट मिळाले नाही तर पक्षाने ज्यांना उमेदवारी दिली आहे त्यांच्या मागे ठामपणे उभे राहावे. लवकरच कोअर कमिटीची नेमणूक करुन साताऱयातील पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या भावना प्रदेशाला कळविल्या जातीलच. 

यावेळी प्रदेश कार्यकारिणी सदस्य अमित कुलकर्णी यांनी सातारा शहरातील कार्यकर्ते चांगले काम करत असून भाजपाचे कमळ हे चिन्ह घराघरात पोहोचवण्याचे आवाहन सर्व कार्यकर्त्यांना केले. भाजप महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा सुवर्णा पाटील यांनी सर्व कार्यकर्त्यांना एकत्रित काम करण्याचे आव्हान केले आणि भाजपच्या महिला उमेदवार जास्तीत जास्त निवडून येतील यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

यावेळी शहराध्यक्ष विकास गोसावी यांनी सातारा शहरातील भारतीय जनता पार्टीच्या कामाचा आढावा घेताना 2014 पासून ज्या निवडणुका झाल्या त्यामध्ये भाजपच्या मतांची टक्केवारीत वाढ झाली, असे सांगितले. तर 2016 पालिका निवडणुकीत 31 ठिकाणी उमेदवार उभे केले आणि नऊ ठिकाणी उमेदवार मिळाले नव्हते. परंतु आताची परिस्थिती खूपच चांगली असून सर्व प्रभागात उमेदवार मिळतील व ते सर्व कमळ या चिन्हावरच निवडणूक लढवतील असे त्यांनी सांगितले.

बैठकीस ज्येष्ठ नेते दत्ताजी थोरात, जिल्हा सरचिटणीस विठ्ठल बलशेटवार, जिल्हा उपाध्यक्ष ऍड. प्रशांत खामकर, राहुल शिवनामे, कोषाध्यक्ष किशोर गोडबोले, नगरसेवक धनंजय जांभळे, विजय काटवटे, मिलिंद काकडे, नगरसेविका सिद्धी पवार, प्राची शहाणे, सातारा ग्रामीणचे अध्यक्ष राजेंद्र इंगळे, सातारा शहरचे सरचिटणीस प्रवीण शहाणे, विक्रांत भोसले, जयदीप ठुसे, उपाध्यक्ष चंदन घोडके, प्रशांत जोशी, वैशाली टंकसाळे, चिटणीस, रवी आपटे, नजमा बागवान आदी उपस्थित होते.

Related Stories

18वर्षावरील नागरिकांचे 70 टक्के लसीकरण करणार

Amit Kulkarni

सातारा : कोरोना बाधित मृतदेहावर अंत्यसंस्कारासाठी ‘ती’ टीम सदैव तत्पर

Abhijeet Shinde

ग्रेड सेपरेटरला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चे नाव देण्याची मागणी

Patil_p

पालिकेच्यावतीने स्वच्छ सर्व्हेक्षणातंर्गत घेतलेल्या स्पर्धेचा निकाल जाहीर

Patil_p

साताऱ्यात निलेश लंके होणार का?

datta jadhav

सातारच्या मेडीकल कॉलेजसाठी पदनिर्मिती आणि पदे भरण्यास मिळाली मान्यता

Patil_p
error: Content is protected !!