तरुण भारत

जिल्हा बंकेवरील टीका खताते, चव्हाणांना भोवणार!

प्रतिनिधी/ चिपळूण

ऐन निवडणुकीच्या धामधुमीत जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कारभारावरील आरोप व टीका राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष जयंद्रथ खताते, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा चित्रा चव्हाण यांना भोवण्याची चिन्हे आहेत. त्यांच्या टीकेची राष्ट्रवादीकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे. दरम्यान, आमदार शेखर निकम, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव यांनीही याबाबत नाराजी व्यक्त करत या दोघांना फटकारले आहे.

Advertisements

   राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष खताते, महिला जिल्हाध्यक्षा चव्हाण यांनी रविवारी पत्रकार परिषद घेत जिल्हा बँकेच्या निवडणुकीत जाहीर झालेल्या पॅनलवरून आपली खदखद व्यक्त केली होती. उमेदवार ठरवताना विश्वासात न घेतल्याचा आरोप करतानाच 5 वर्षांतील बंकेच्या कारभारावरही जाहीरपणे ताशेरे ओढले. दरम्यान, दोन्ही जबाबदार स्थानिक नेत्यांनी जाहीरपणे पक्ष नेतृत्वावर केलेल्या  टीकेची पक्षीय स्तरावर दखल घेण्यात आली आहे. या दोघांना याबाबतचा जाब विचारला जाणार असून कारवाई अटळ असल्याची शक्यता राष्ट्रवादीच्या सूत्रानी व्यक्त केली आहे.

  यासंदर्भात आमदार शेखर निकम यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, राष्ट्रवादीने जिल्हा बँकेच्या निवडणुकीची जबाबदारी तानाजी चोरगे यांच्यावर सोपवलेली असल्याने ते जे निर्णय घेतील तो आम्हाला मान्य आहे. सहकार क्षेत्रातील जिल्हा बँकेच्या निवडणुकीत उमेदवारी निश्चित करताना जिह्यात कोणत्याच तालुकाध्यक्षासोबत याबाबतची चर्चा झालेली नाही. त्यामुळे खताते अथवा चव्हाण यांनी आपले मत जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव यांच्याकडे मांडायला हवे होते. खतातेंनी खेर्डी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत वेगळा निर्णय घेतला त्यावेळी आम्हाला त्याची कल्पनाही दिली गेली नव्हती. नेते म्हणून मान्य करायचे आणि त्याला विरोधही करायचा, अशी भूमिका योग्य नसल्याचे सांगत निकम यांनी खतातेंना फटकारले आहे.

   राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव म्हणाले की, जबाबदार पदाधिकाऱयांकडून अशा प्रकारचे वर्तन हे योग्य नाही. पक्षाकडून याची गंभीर दखल घेण्यात आली आहे. सध्या आम्ही निवडणुकीत व्यस्त असल्याने त्यांच्या वक्तव्यांकडे तातडीने लक्ष देण्याची गरज वाटत नाही. निवडणुकीनंतर याबाबत विचार करू असे त्यांनी सांगितले.

   निवडणूक आली की फटाके फुटतात…

जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक जाहीर झाली की आरोप आणि टीकेचे फटाके चिपळुणातच फुटत असतात. घेल्या वेळी माजी आमदार रमेश कदम यांनी बंकेच्या कारभारावर सडकून टीका केली होती. त्यावरील आरोप-प्रत्यारोपही गाजले होते. आता राष्ट्रवादीच्याच खताते व चव्हाण यांनी आरोप करत ताशेरे ओढले आहेत.

Related Stories

खोरनिनको धरणाच्या जलसेतूचे काम प्रगती पथावर!

Patil_p

भातगावात वाळूचा संक्शन पंपाव्दारे उपसा

Patil_p

सीआरझेडमधील शासकीय इमारतींना लाभ होणार?

NIKHIL_N

राज्यातील पोलीस अधीक्षकांच्या बदल्यांना पुन्हा ‘ब्रेक’

Abhijeet Shinde

चिपळुणात 26 लाखांचा गुटखा जप्त

Patil_p

वोकल फॉर लोकल फेस्टिवलचे उदघाटन

NIKHIL_N
error: Content is protected !!