तरुण भारत

वेदांता महिला फुटबॉल स्पर्धेत शिरवडे, वायएफएचे विजय

क्रीडा प्रतिनिधी /मडगाव

गोवा फुटबॉल संघटनेने आयोजित केलेल्या वेदांता महिला लीग फुटबॉल स्पर्धेत फुटबॉल क्लब यूथ फुटसाल अकादमी आणि शिरवडे स्पोर्ट्स क्लबने आपआपल्या प्रतिस्पर्धी संघावर विजय नोंदविले. धर्मापूर मैदानावर खेळविण्यात आलेल्या लढतीत फुटबॉल क्लब वायएफए संघाने काँपेशन एफसीचा एकमेव गोलने पराभव केला. हा गोल जॉलिंदा फॅर्रांवने सामन्याच्या 25व्या मिनिटाला केला.

Advertisements

नावेलीतील रोझरी मैदानावर खेळविण्यात आलेल्या सामन्यात शिरवडे स्पोर्ट्स क्लबने आपली विजयी आगेकूच पुढे चालू ठेवताना युनायटेड क्लब ऑफ तळावलीचा 2-0 गोलानी पराभव केला. यूसी तळावली संघाने शिरवडे स्पोर्ट्स क्लबला चांगलेच रोखून ठेवले होते. शेवटी 86व्या मिनिटाला नॅविल्ला कुलासो आणि शेवटच्या मिनिटाला विनोष्का फर्नांडिसने शिरवडेचे गोल केले. नॅविल्ला कुलासोला प्लेअर ऑफ दी मॅच पुरस्कार प्राप्त झाला.

Related Stories

टपालातील भाजी बियांची पाकिटेच जेव्हा गायब होतात..

Omkar B

मगोपचे 18 उमेदवार निश्चित

Omkar B

ईस्ट बंगालचा गोलरक्षक देबजित मजुमदार चेन्नईन एफसीला

Amit Kulkarni

राज्याच्या हिताआड असलेल्या प्रकल्पांना विरोध करण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे

Patil_p

अनु. जमाती महामंडळाच्या संचालकपदी खुशाली वेळीप

Patil_p

डॉ. विशाल च्यारीची आत्महत्त्या नव्हे घातपात

Patil_p
error: Content is protected !!