तरुण भारत

धेंपो क्लब-चर्चिल ब्रदर्स प्रो. फुटबॉल स्पर्धेतील लढत बरोबरीत

क्रीडा प्रतिनिधी /मडगाव

गोवा फुटबॉल संघटनेने आयोजित केलेल्या गोवा प्रोफेशनल लीग फुटबॉल स्पर्धेतील चर्चिल ब्रदर्स स्पोर्ट्स क्लब आणि धेंपो स्पोर्ट्स क्लब यांच्यातील रोमहर्षक लढत गोलशून्य बरोबरीत सुटली. जीएफएच्या धुळेर मैदानावर काल हा सामना खेळविण्यात आला. या निकालाने उभय संघांना प्रत्येकी एक गुण प्राप्त झाला.

Advertisements

या सामन्यात गोल करण्याच्या समान संधी उभय संघांना प्राप्त झाल्या होत्या. मात्र, त्यांचे स्ट्रायकर्स गोल करण्यात अपयशी ठरले. सामन्याच्या आरंभालाच चर्चिल ब्रदर्सच्या कुआन गोम्सची गोल फ्रिकीकवर गोल करण्याची संधी थोडक्यात हुकली. त्याने हाणलेला जबरदस्त फटका गोलबारला जाऊन आदळला.

दुसऱया सत्रात 52व्या मिनिटाला धेंपो क्लबच्या अमन गोवेकरने गोल नोंदविण्याची सोपी संधी वाया घालविली. लगेच चर्चिल ब्रदर्सच्या विनील पुजारीचा गोल करण्याचा यत्न धेंपोचा गोलरक्षक डायलन डिसिल्वाने हाणून पाडला. चर्चिल ब्रदर्स क्लबने शेवटच्या पंधरा मिनिटात आक्रमक खेळ केला, मात्र गोल करण्यात त्यांच्या खेळाडूंना अपयश आले. लढतीच्या 84व्या मिनिटाला धेंपो क्लबच्या नॅसियो फर्नांडिसची गोल करण्याची संधी थोडक्यात हुकली.

Related Stories

साळ गावात यावषीही महापुराचा धोका.

Omkar B

भाजप सरकारने गोव्याची स्थिती संघप्रदेशासारखी करून टाकली

Amit Kulkarni

कुळे येथे 3 एमएलडी जलशुद्धीकरण प्रकल्पाचा शिलान्यास

Amit Kulkarni

कुचेली येथे दारुच्या नशेत जाळून खून

Omkar B

बाबुशच्या विरोधात ‘वुई पणजेकार’ नी दंड थोपटले

Amit Kulkarni

ओबीसी आरक्षणात भंडारी समाजाला राखिवता द्यावी

Amit Kulkarni
error: Content is protected !!