तरुण भारत

दीपक ढवळीकर यांनी प्रियोळातून प्रचाराचा नारळ फोडला

वार्ताहर /सावईवेरे

प्रियोळ मतदारसंघातून मगो पक्षाचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी विधानसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला असून रविवारी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह त्यांनी प्रचाराचा नारळ फोडला. सावईवेरे येथील श्री सातेरी व अनंत देवस्थानला भेट देऊन देवदर्शन घेतले व त्यानंतर प्रचार कार्याला सुरुवात केली.

Advertisements

यावेळी प्रसार माध्यमांसमोर बोलताना ते म्हणाले मगो पक्ष हा गोव्याच्या भूमीतील पक्ष असून त्याला साठ वर्षांचा इतिहास आहे. अजूनही गोव्यात या पक्षाचा प्रभाव आहे. येणाऱया विधानसभा निवडणुकीत मगो पक्ष स्वबळावर निवडणूक लढविणार असून आतापर्यंत 12 मतदारसंघामध्ये उमेदवार निश्चित करण्यात आले आहे. येत्या काही दिवसात 18 ते 22 मतदारसंघामध्ये उमेदवार जाहीर केले जातील, अशी माहिती त्यांनी दिली.

आत्तापर्यंत प्रियोळ मतदारसंघातील खांडोळा, तिवरे वरगांव, बेतकी भागात कार्यकर्त्यांच्या बैठका झाल्या असून लवकरच वळवई, केरी या भागात बैठका होणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रियोळ मतदारसंघातील नागरिकांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करून त्यावर तोडगा काढला जाईल. गोव्यातील काही महत्त्वाचे प्रश्न घेऊन मगो पक्ष स्वबळावर निवडणुकीला सामोरे जाणार आहे, असेही त्यांनी जाहीर केले. कोरोना महामारी व महापुराचा गोव्याला मोठा फटका बसला असून राज्यात बेरोजगारीची समस्या गंभीर बनलेली आहे. सरकार आपल्या दारी हा भाजपाचा निवडणूक स्टंट असून केवळ मतांची गणिते बांधून सरकार जनतेची फसवणूक करीत आहे, अशा उपक्रमांवर सरकारी निधीचा गैरवापर होत असल्याचा आरोपही त्यांनी केला. भाजपा सरकारला जनतेच्या समस्या सोडवायच्या नसून केवळ गोव्यात आपले अस्तित्व राखून राज्य करायचे आहे. पेट्रोल व डिझेलाचे दर भडकले असून त्यामुळे महागाईच्या वणव्यात जनतेचे जगणे मुश्किल झाले आहे. येणाऱया निवडणुकीत मगो पक्ष जनतेच्या हिताचा व राज्याच्या प्रगतीचा जाहीरनामा घेऊन पुढे येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

प्रियोळ मतदारसंघात मगो पक्षाचे गटाध्यक्ष म्हणून हरिश्चंद्र जल्मी यांची निवड झाल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले. वेलिंग जिल्हा पंचायत सदस्य दामोदर नाईक, कुर्टीच्या जिल्हा पंचायत सदस्य प्रिया च्यारी तसेच माजी जिल्हा पंचायत सदस्य शिवदास गावडे, आनंद नाईक, दिगंबर कुमठेकर, सच्चित पालकर, अनिल वेरेकर, शांबा सुर्लकर, मांगिरीश भांडये, विनय नाईक, बाबलो शेट वेरेकर, कृष्णनाथ नाईक, दामोदर दिवकर, बाबू च्यारी, शैलेश खेडेकर, दिलीप शिलकर, मनोहर पेरणी, दत्तराज शेट वेरेकर, मधुकर च्यारी, सच्चित च्यारी तसेच महिला व युवा कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Stories

ओडिशावर विजय नोंदवून एफसी गोवा चौथ्या स्थानावर

Amit Kulkarni

केपेतील साप्ताहिक बाजार आजपासून तात्पुरता बंद

tarunbharat

रेल्वे दुपदरीकरणानंतर मुरगाव बंदरात कोळसा हाताळणी वाढणार हा प्रचार खोटा

Amit Kulkarni

पर्यटक, अन्य बिगरगोमंतकीयांनी गोव्यात येण्यावर त्वरित बंदी घाला

Omkar B

कोरोनाच्या कहरातही अवघा गोवाही राममय

Omkar B

वादळामुळे ऑर्किड लागवडीचे 8 लाखांचे नुकसान

Amit Kulkarni
error: Content is protected !!