तरुण भारत

ऑनलाईन परीक्षेसाठी वाळपई सरकारी उ. मा.च्या विद्यार्थ्यांचे धरणे

प्रतिनिधी /वाळपई

 ऑनलाइन पद्धतीच्या परीक्षेसाठी वाळपई सरकारी उच्च माध्यमिक विद्यालयाच्या मुलांना आज धरणे धरण्याचा कार्यक्रम केला. यामध्ये मोठय़ा प्रमाणात विद्यार्थी सहभागी झाले होते.

Advertisements

 याबाबतची माहिती अशी की वाळपई सरकारी उच्च माध्यमिक विद्यालयाच्या अकरावी विद्यार्थ्यांसाठी परीक्षा आयोजित करण्यात आली होती. सदर परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेण्यात येणार असल्याचे विद्यालयातर्फे स्पष्ट करण्यात आले होते. यामुळे निराश बनलेल्या विद्यार्थ्यांनी आज सकाळीच विद्यालयाच्या समोर धरणे धरण्याचा कार्यक्रम केला. आम्हाला ऑनलाइन पद्धतीने परीक्षा हवी ऑफलाइन पद्धतीने परीक्षा नको अशा प्रकारची मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी मुलांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर शिक्षकांसमवेत झालेल्या चर्चेत सर्व शाळांमधून ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घेण्यात येत आहे. सरकारी उच्च माध्यमिक विद्यालयात ऑफलाईन पद्धतीची परीक्षा कशाला अशाप्रकारचा सवाल यावेळी त्यांनी केला. यावेळी विद्यालयाचे प्राचार्य रियाज जमादार यांच्याशी झालेल्या चर्चेत त्यांनी ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घेण्याची मागणी केली. यावर आपला अभिप्राय व्यक्त करताना प्राचार्य रियाज जमादार यांनी सांगितले की यासंदर्भातील महत्त्वाची पालक शिक्षक संघाची बैठक मंगळवारी घेण्यात येणार आहे .त्या संदर्भात विचारविनिमय करून सरकारला यासंदर्भात पत्र पाठविण्यात येणार असून त्यांच्या आदेशानुसार परीक्षा घेण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी उपस्थितांना सांगितले.

सदर विद्यालय हे सरकारी असल्यामुळे विद्यालयाच्या शिक्षकांना याबाबत निर्णय घेता येत नाही. यासंदर्भाचा आदेश शिक्षण खात्याकडून येणे अत्यंत गरजेचे आहे. यामुळे त्यांच्या आदेशाशिवाय आपण निर्णय घेणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले व त्यासाठी काही दिवस मुदत देण्याची विनंती त्यांनी यावेळी केली.

यासंदर्भात रियाज जमादार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ऑनलाइन पद्धतीचा परीक्षेसाठी धरणे धरण्याचा कार्यक्रम केला. आज परीक्षा घेण्यात येणार होती. मात्र मुलांनी अचानकपणे धरणे धरण्याचा कार्यक्रम केल्यामुळे सध्यातरी परीक्षा पुढे ढकलण्यात आलेली आहे. शिक्षण खात्याच्या आदेशानुसारच येणाऱया काळात या संदर्भाचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे रियाज जमादार यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना स्पष्ट केले.

Related Stories

सोनसडा यार्डनजीकच्या रस्त्यांना बकाल स्वरूप

Amit Kulkarni

राजकीय क्रांतीसाठी मगो-तृणमूलला संधी द्यावी

Patil_p

सार्वजनिक बांधकाम मंत्री दीपक पाऊसकर अपक्ष लढणार

Sumit Tambekar

मोरजी येथील अपघातात मांगेलीतील युवकाचा मृत्यू

Patil_p

मुख्यमंत्र्यांची मध्यरात्री केरी तपासणी नाक्याला भेट

Patil_p

उतोर्डा खुनी हल्लाप्रकरणी कोर्टाचा आदेश

Amit Kulkarni
error: Content is protected !!