तरुण भारत

माशेल येथे शिक्षकाची आत्महत्या

वार्ताहर /माशेल

चिमुलवाडा-माशेल येथील एका शिक्षकाने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार काल सोमवारी सायंकाळी 4 वा. सुमारास उघडकीस आला. विनयकुमार उर्फ संजित नारायण सावईकर (वय 56) असे त्यांचे नाव आहे.   फोंडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयत विनयकुमार हा माशेल येथील  शारदा इग्लिश हायस्कूलात गणित व विज्ञान विषयातील शिक्षक होता. मागील काही दिवसापासून तो मानसिक तणावाखाली होता. त्याने राहत्या घरात दुपट्टाच्या सहाय्याने घरातील पंख्याला लटकवून गळफास घेतला. घरातील मंडळीना सदर प्रकार उघडकीस येईपर्यत उशिर झाला होता. फोंडा पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी बांबोळी येथील गोमेकॉत पाठविण्यात आला आहे. आत्महत्येमागील कारण अजून स्पष्ट झालेले नाही. मयत विनयकुमार यांची आईही एक निवृत्त शिक्षीका असून सर्व कुटूंबिय उच्चशिक्षीत आहे. त्यानी असे पाऊल उचलल्यामुळे सर्व परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले कौस्तुभ व प्रांजली असा परिवार आहे. फोंडा पोलिसांनी सदर घटनेची अनैसर्गिक मृत्यू म्हणून नोंद केली असून याप्रकरणी उपनिरीक्षक विभीनव शिरोडकर अधिक तपास करीत आहे.

Advertisements

Related Stories

नितीन गडकरी यांची शनिवारी ऑनलाईन सभा

Omkar B

कोरोना लॉकडाऊनच्या खरेदीसाठी माशेल उसळली गर्दी

Patil_p

ढवळीकरांना घराणेशाहिची भाषा शोभत नाहि प्रदीप शेट यांचा आरोप

GAURESH SATTARKAR

डिचोली तालुक्मयात आज सोमवारी कोरोनाचे 13 नविन रुग्ण

Amit Kulkarni

घोगळ-मडगाव येथे बालकीर्तनकार साठेंची कीर्तने

tarunbharat

फोंडा शहर लॉकडाऊनचा तुर्त विचार नाही !

Omkar B
error: Content is protected !!