तरुण भारत

डिचोली तालुक्यातील बहुतेक हायस्कुलांमध्ये ऑफलाईन वर्ग सुरू

परिक्षा असल्याने उपस्थिती कमी. सर्व मार्गदर्शक तत्वे पाळून वर्गात प्रवेश. विद्यर्थ्यांमध्ये उत्साह. पालकही आनंदीत.

डिचोली/प्रतिनिधी

Advertisements

कोवीड रूग्णसंख्येत सध्या घट होत असून परिस्थिती सुधारत असल्याचे पाहून राज्या सरकारने काल सोम. दि. 18 ऑक्टो. पासून नववी, दहावी, अकरावी व बारावीच्या ऑफलाईन वर्गा?ना प्रारंभ करण्याचा घेतलेल्या निर्णयाला बहुतेक हायस्कूल व उच्च माध्यमिक हायस्कुलांनी पाठिंबा दिला आहे. सोमवारी डिचोली तालुक्मयातील बहुतेक हायस्कुलांमध्ये सरकारने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वा?चे काटकोरपणे पालन करून वर्गा?ना प्रारंभ झाला. या वर्गा?मुळे सुमारे दिड वर्षांनंतर पुन्हा हायस्कुलांमध्ये पाय ठेवलेल्या विद्यार्थ्यांमध्ये उत्साह आणि आनंद दिसून आला. तसेच अनेक पालकही आनंदीत होते.

मार्च 2020 साली कोरोना व्हायरसच्या फैलावाच्या भितीने संपूर्ण देशात आणि राज्यातही लॉकडाऊन लागू झाल्यानंतर हायस्कूल आणि विद्यार्थी यांचा संबंधच तुटला होता. त्यावर सरकारने ऑनलाइन शिक्षणाचा काढलेला उपाय सर्वत्रच सफल झाला असे नाही. तर अनेक ठिकाणी मोबाईल नेटवर्कमुळे विद्यर्थ्यांची समस्या झाली. तसेच आर्थिक परिस्थिती बिकट असलेल्या मुलांना स्मार्टफोन विकत घेणे हेही मोठे आव्हान होते. तरीही समाजातील काही दानशूर व्यक्ती, राजकीय नेते यांनी पुढाकार घेत विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणासाठी मदत केली.

   पहिल्या, दुसऱया लाटेनंतर सर्वत्र भयावह वातावरण पसरले असतानाच सप्टेंबर – ऑक्टोबर महिन्यात तिसरी लाट धडकण्याची शक्मयता व्यक्त करण्यात आल्याने पुन्हा हायस्कूल, शाळा बंद राहणार याच चिंतेने विद्यर्थ्यांपेक्षा पालकांची भंबेरी उडाली होती. परंतु सोमवारपासून नववी ते बारावी का असेना, या चार इयत्तेचे वर्ग थेट हायस्कुलांमध्ये सुरू व्हायला लागणार या कल्पनेनेच अनेक पालकांच्या मनाला आराम दिला आहे. त्यामुळे आता शाळा पातळीवरील वर्गही ऑफलाईन सुरू होण्याची अपेक्षा सर्वत्रच व्यक्त केली जात आहे.

श्री शांतादुर्गा उच्च माध्यमिक विद्यालयात अकरावीचे वर्ग सुरू.

डिचोलीतील विद्यावर्धक मंडळामार्फत चालणाऱया श्री शांतादुर्गा उच्च माध्यमिक विद्यालयात कालपासून अकरावीचे वर्ग ऑफलाईन पध्दतीने सुरू झाले. या शिक्षण मंडळाने एक पाऊल सरकारच्या आदेशापूर्वीच पुढे मारताना नववी, दहावी व बारावीचे वर्ग सर्व कोवीड मार्गदर्शक तत्वे पाळत सुरू केले होते. गेल्या आठ दिवसांपासून हे वर्ग सुरूच असताना सरकारतर्फे या चार इयत्ता?चे वर्ग ऑफलाईन सुरू करण्याची सुचना आली आणि अकरावीचे वर्ग कालपासून सुरू करण्यात आले. असे या मंडळाचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी सांगितले.

डॉ. शेखर साळकर यांनी केली पाहणी

विद्यावर्धक मंगळाचे व्यवस्थापन समितीचे सदस्य असलेल्या डॉ. शेखर साळकर यांनी काल सोमवारी सकाळी शांतादुर्गा उच्च माध्यमिक विद्यालयाच्या अकरावीच्या वर्गा?ना व इतरही वर्गा?मध्ये भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी विद्यालयाने सर्व कोवीड मार्गदर्शक तत्वा?चे पालन केल्याबद्दल समाधान व्यक्त केले. या हायस्कुलने चांगल्या पध्दतीने सर्व कोवीड मार्गदर्शक तत्वे पाळली असून अशाच प्रकारे जर वर्ग यापुढे सुरू ठेवल्यास हे शिक्षण कोणत्याही अडथळय़ाविना पूर्ण करण्यास मदत मिळणार. तिसरी लाट धडकणार की नाही, त्याची तीव्रता काय असणार याबद्दल प्रश्नचिन्ह असले तरी सध्या ज्याप्रकारे परिस्थिती सुधारलेली आहे, तशीच जर परिस्थिती सुधारत गेली तर हळुहळू राज्यातील शाळा, हायस्कूल, उच्च माध्यमिक विद्यलिये सुरू होण्यास वाव मिळणार, असे डॉ. शेखर साळकर यांनी सांगितले.

शांतादुर्गा हायस्कुलमधील नववी व दहावीचे वर्ग आठ दिवसांपूर्वीच सुरू करण्यात आले होते. विद्यार्थ्यांचा तापमान तपासणे, वर्गात अंतर ठेऊन बसविणे, सक्तीने मास्क तोंडावर ठेवणे, केंटीनमध्ये बसू न देता पार्सल घेऊन वर्गात बसून खाणे, जमाव करून एकत्रितपणे राहू नये, एकमेकांबरोबर बोलताना सामाजिक सुरक्षा अंतर राखणे, सेनिटायझरचा नियमित वापर करणे व इतर तत्वा?चे पालन काटेकोरपणे करण्यात येत होतेच. व विद्यार्थीही त्यास चांगला प्रतिसाद देत होते.  आता सरकारच्या आदेशानंतरही सर्वत्या मार्गदर्शक तत्वा?चे पालन करून वर्ग घेतले जाणार आहे, असे विद्यावर्धक मंडळाचे अध्यक्ष विजय सरदेसाई यां?नी सांगितले.

मुळगाव येथील सरकारी हायस्कुलात पाहणी केली असता नववी व दहावीच्या वर्गामध्ये विद्यर्थ्यांनी उपस्थिती लावली होती. या सर्व विद्यार्थ्यांचा सर्वप्रथम तापमान तपासण्यात आल्यानंतर त्यांना हायस्कुलमध्ये प्रवेश देण्यात आला. तसेच एका बाकावर एक याप्रमाणे त्यांना बसविण्यात आले. काही विद्यार्थ्यांनी हायस्कुलचा गणवेश घातला होता तर काहींना तो घट्ट होत असल्याने त्यांनी घातला नव्हता. अशा विद्यार्थ्यांना येत्या चार पाच दिवसांमध्ये गणवेश तयार करून घालून येण्याची सुचना दिली आहे. असे हायस्कुलचे मुख्याध्यापक शिवदास कवठणकर यांनी सांगितले.

हे वर्ग चालू झाल्यानंतर शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचे रिव्हीजन घेण्यास सांगितले आहे. त्याप्रमाणे येणारी परीक्षा विद्यार्थ्यांना ऑनलाइन पाहिजे कि ऑफलाईन यावर त्यांची मते घेऊन निर्णय घेतला जाणार आहे, असेही मुख्याध्यापक कवठणकर यांनी सांगितले.

Related Stories

विधानसभेनंतर पंचायत निवडणुकीचे पडघम

Amit Kulkarni

अशिलाच्या सल्ल्यानेच वकील बाजू मांडतात

Amit Kulkarni

भूमिपुत्र अधिकारिता विधेयकातून आक्षेपार्ह ‘भूमिपुत्र’ शब्द हटवा

Amit Kulkarni

देशाच्या विकासासाठी भाजपाला गोवा जिंकणे महत्वाचे – जी किशन रेड्डी

Amit Kulkarni

कोरोनाविषयी नवीन ‘एसओपी’ आजपासून

Omkar B

राज्यात शनिवारपर्यंत पावसाची शक्यता

Amit Kulkarni
error: Content is protected !!