तरुण भारत

मुख्यमंत्री, आरोग्य मंत्री आणि जीएमसीचे डीन यांनी राजीनामा द्यावा

आपची मुख्यमंत्र्यांकडे तीन सदस्यीय समितीचा अहवाल सार्वजनिक करण्याची मागणी!

प्रतिनिधी /पणजी

Advertisements

आयआयटी गोवाचे संचालक बी.के. मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील त्रीसदस्यीय समितीचा अहवाल प्रसारमाध्यमांमध्ये आल्यानंतर आपने सोमवारी सावंत सरकार, आरोग्य मंत्री विश्वजीत राणे आणि जीएमसी डीन यांना धारेवर धरले . आपने केलेल्या आरोपांनुसार, गोव्यातील ऑक्सजिन संकटासाठी भाजप सरकारसह आरोग्य मंत्री विश्वजीत राणे आणि जीएमसी डीन दोषी ठरवले आहे. दुसऱया लाटेदरम्यान. जीएमसी अधिकाऱयांनी वेळेवर ऑक्सजिनच्या कमतरतेचा मुद्दा उपस्थित केला नाही आणि गार्डच्या इशाऱयांकडेही दुर्लक्ष केले, असे या अहवालात स्पष्ट झाले आहे. या निष्काळजीपणामुळे अनेक गोमंतकीयांनां प्राणास मुकावे लागल्याचा आरोपही आम आदमी पक्षाने केला.गोवा वैद्यकीय इस्पितळाचे अधिकारी वेळेवर प्राणवायू उपलब्ध करून देण्यात अपयशी ठरले होते ज्यामुळे राज्यात मोठय़ा प्रमाणात ऑक्सजिनची कमतरता निर्माण झाली. या दुर्घटनेची संपूर्ण जबाबदारी मुख्यमंत्री, आरोग्य मंत्री आणि गोवा वैद्यकीय इस्पितळ डीनवर आहे. मे 2020 मध्ये गोवा असोसिएशन रेसिडेंट डॉक्टर्स (गार्ड) ने गोवा वैद्यकीय इस्पितळाच्या डीनना पत्र लिहून ऑक्सजिनच्या कमतरतेची माहिती दिली होती. मे 2020 च्या 19 दिवसांमध्ये कोविडमुळे 1000 लोकांनी आपले प्राण गमावले आणि जर सरकारने गार्ड ओ द्वारे सादर केलेल्या निवेदनावर कार्य केले असते तर ते टाळता आले असते असेही आम आदमी पक्षाचे म्हणणे आहे .गोवा वैद्यकीय इस्पितळाच्या अधिकाऱयांनी ऑक्सजिनच्या पुरवठा सुरळीत होण्या करीता ठोस उपाय योजनाच केली नाही. कोविड रुग्णाच्या ऑक्सजिनच्या गरजेचा अंदाजहि घेतला नाही. सरकारला ऑक्सजिनची तरतूद करता आली असती, पण सरकार पूर्णपणे निष्काळजी होते आणि गोवा वैद्यकीय इस्पितळाचे डीनही त्याच्या कर्तव्यात अयशस्वी झाले. संपूर्ण गोव्यात ऑक्सजिन पुरवण्यासाठी सरकारने एकच पुरवठादार एम/एस स्कूप आणला होता, ज्याने गोवा वैद्यकीय इस्पितळ व्यतिरिक्त सर्व रुग्णालयांना ऑक्सजिन पुरवणे बंद केले ज्यामुळे तीव्र टंचाई निर्माण झाली. या बिकट परिस्थितीत एकच पुरवठादार संपूर्ण राज्याच्या पायाभूत सुविधांसाठीच का निवडला गेला? असा संतप्त सवाल आम आदमी पक्षाने विचारला आहे.

या कठीण काळात गोमंतकीयाना त्यांच्या स्वतः च्या उपकरणांवर या संकटाचा सामना करावे लागले होते. त्यातच गोवा वैद्यकीय इस्पितळाच्या भयावह अंधाऱया तासां दरम्यान होणार मृत्यूच तांडव…या दुर्घटनांनी पहाटेच्या दोन ते चार  दरम्यान  नागरिकांना सतर्क केले, एसओएस संदेश पाठवले, त्यानंतरहि हे अस्वेद्नशील सरकार भानावर आले नाही. ऑक्सजिनच्या कमतरतेमुळे अनेक गोमंतकीयापैकी बरेच जे÷ नागरिक मृत्युमुखी पडले. बेडसाठी ऑक्सजिनची कमतरता आणि व्हेंटिलेटर उपलब्ध नसल्यामुळे ज्या सरकारने मदत करणे अपेक्षित होते ते त्यांच्या कर्तव्यात पूर्णपणे अपयशी ठरले. या मृत्यू?ची जबाबदारी मुख्यमंत्र्यांसह आरोग्य मंत्री विश्वजीत राणे आणि जीएमसी डीन यांच्यावर आहे.

गंभीर बाब म्हणजे ऑक्सजिन पुरवठा इतरही आस्थापने असताना ’स्कूप इंडस्ट्रीज’.हा एकच पुरवठादार का होता? असा सवाल राहुल म्हांबरे यांनी भाजप सरकारला केला आहे.”फक्त जीएमसी डीन मध्ये काय संबंध होता की फक्त एकच पुरवठादार होता. पर्यायी पुरवठादाराची तरतूद का करण्यात आली नव्हती ? इतर विपेते नव्हते का ? या प्रश्नाची उत्तरे सरकारने द्यावी अशी मागणीहि राहुल म्हांबरे यांनी केली. कोविड प्रकरणांमध्ये वाढ होणार आहे हे जाणून, ऑक्सजिन वाढवण्याची देखील आवश्यकता असेल याची जाणीव असताना भाजप सरकार बेजबाबदारपणे गाफील राहिला असा आरोप म्हांबरे यांनी केला.यावरून एकच सिद्ध होते आहे की भाजप सरकारला लोकांच्या जीवाशी खेळण्याची सवय आहे, अशी पुष्टी त्यांनी जोडली.

जीएएमसी मधील पायाभूत सुविधांकडे पूर्ण दुर्लक्ष केल्यामुळे गोवा खंडपीठात जनहित याचिका दाखल केलेल्या आपचे गोवा संयोजक राहुल म्हांबरे यांनी ऑक्सजिनच्या मूल्यांकनाकडे लक्ष वेधले. अधिकाऱयांनी देखील केले नाही, कोणतीही खबरदारी घेतली गेली नाही. “मला मुख्यमंत्री, आरोग्य मंत्री आणि जीएमसी डीन यांना 3 प्रश्न विचारायचे आहेत. प्रश्न 1ः गार्डने ऑक्सजिनचा अभाव असल्याची माहिती दिली तेव्हा कोणतीही कारवाई का केली नाही?

Related Stories

सरकारने परवानगी नाकारली तरी 31 मार्च रोजी शिवजयंती दिनी

Amit Kulkarni

‘हाऊज बिल्डींग ऍडवान्स’ विषयावर गोवा फॉरवर्डचा लेखा संचालकांना घेराव

Patil_p

फोंडय़ात भव्य पुस्तक प्रदर्शन

Patil_p

मांदे येथे आयोजित केलेल्या बैलाच्या झुंझी प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल

Amit Kulkarni

शासक आणि नागरिक कसे असावेत हे दाखवणारा “नमो” : दिग्दर्शक विजीश मणी

Abhijeet Shinde

सांगे आरोग्य केंद्राला रुग्णवाहिका, वॉटर कूलर

Amit Kulkarni
error: Content is protected !!