तरुण भारत

एसीजीएल कंपनी कामगार बांधवाच्या मागण्या मंगळवारपर्यन्त सोडवा

अन्यथा बुधवारपासून कुंटुबासह रस्त्यावर उतरणार

प्रतिनिधी /वाळपई

Advertisements

 गोव्याच्या ऑटोमोबाईल क्षेत्रांमध्ये विशिष्ट अशी ओळख असलेल्या जवळपास भुईपाल  येथील एसीजीएल कंपनीच्या कामगार संघटनेतर्फे आज पाच दिवशी संपाला सुरुवात झाली. मंगळवार पर्यंत कंपनीच्या व्यवस्थापनाला सादर करण्यात आलेल्या मागण्या संदर्भात सहानुभूतीपूर्वक विचार करावा अन्यथा बुधवारपासून संपूर्ण कुटुंबासह रस्त्यावर उतरण्याचा इशारा कंपनीच्या कामगार संघटनेने दिलेला आहे.

 कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला कंपनीचे व्यवस्थापन जबाबदार राहणार असल्याचा इशारा दिल्यामुळे बुधवारपासून याकंपनी कामगारांचा संप चिघळण्याची शक्मयता निर्माण झालेली आहे. आज सकाळपासून या संपाला सुरुवात झाली. यामध्ये कंपनीचे सर्व कामगार मोठय़ा प्रमाणात सहभागी झाले होते. या संपाला महाराष्ट्र नवनिर्माण सेना कामगार संघटनेने आपला पूर्ण पाठिंबा व्यक्त केलेला आहे .

याबाबतची माहिती अशी की गेल्या तीन वर्षापासून कंपनीच्या कामगार संघटनेतर्फे अनेकवेळा व्यवस्थापनाला निवेदने देण्यात आली. मात्र त्यासंदर्भात अजून पर्यंत कंपनीने सहानुभूतीपूर्वक विचार केलेला नाही. यामुळे संतप्त बनलेल्या कामगार संघटनेने पंधरा दिवसापूर्वी कंपनीच्या व्यवस्थापनाला पाच दिवशीय संपाची नोटीस दिली होती. त्यानुसार आज सकाळी कामगार संघटनेने संप पुकारला. सकाळी 8 वाजल्यापासून कंपनीचे कामगार मोठय़ा प्रमाणात कंपनीच्या गेटवर जमा होऊन आंदोलन केले.

कंपनीच्या व्यवस्थापनाच्या विरोधात व काही अधिकाऱयांच्या विरोधात घोषणाबाजी करुन त्यांनी आपला तीव्र स्वरूपाचा संताप व्यक्त केला. यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना कामगार संघटनेचे पदाधिकारी सामील झाले होते. त्यानंतर कामगारा समोर बोलताना संघटनेचे पदाधिकारी सुभाष परब यांनी सांगितले की गेल्या तीन वर्षापासून कंपनीचे व्यवस्थापन कामगारांच्या बांधवांवर वेगवेगळय़ा मागण्यांसंदर्भात दुर्लक्ष करीत आहे. अनेकवेळा विनंती व निवेदने केली.मात्र त्याचा अजून पर्यंत कोणताही फायदा झालेला नाही .यामुळे कामगारांच्या हक्कावर आलेली गदा यामुळे संपावर जाण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. कंपनीच्या व्यवस्थापनाला व सरकारच्या कामगार आयुक्तांना या संदर्भात निवेदने देण्यात आलेली आहे. मात्र त्या संदर्भात अजून पर्यंत कोणत्याही प्रकारची हालचाल केली नसल्यामुळे आजपासून पाच दिवसीय संप पकारण्यात आल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

तर बुधवारपासून कुटुंबासह रस्त्यावर उतरणार.

यावेळी बोलताना गुणाजी परब यांनी सांगितले की ?गळवारपर्यंत कंपनीच्या व्यवस्थापनाने कामगार संघटनेतर्फे देण्यात आलेल्या मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा. अन्यथा बुधवारपासून सर्व कामगार आपल्या कुटुंबासह आंदोलनांमध्ये उतरणार असून कायदा व सुव्यवस्था याचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची पूर्ण जबाबदारी व्यवस्थापनाची राहणार आहे. पगारवाढ व वेगवेगळय़ा स्वरूपात सुविधा बंद करण्यात आल्यामुळे कामगारासमोर आज मोठी अडचण निर्माण झालेली आहे. मानवता दृष्टिकोनातून यासंदर्भात गांभीर्याने विचार करण्याची गरज होती. मात्र कंपनीचे व्यवस्थापन याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप या वेळी गुणाजी परब यांनी केला.

मनसे कामगार संघटनेचा पाठिंबा.

दरम्यान गेल्या तीन महिन्यापूर्वी एसीजीएल कंपनी कामगार संघटनेने महाराष्ट्र नवनिर्माण सेना कामगार संघटनेशी करार केलेला आहे. आजच्या या संपात मनसे कामगार संघटनेने सहभागी होण्याचा निर्णय घेतलेला आहे. यासंदर्भात बोलताना सदर कामगार संघटनेचे नेते यशवंत हडगे यांनी सांगितले की कंपनीच्या व्यवस्थापनाने कंपनीचा कारभार सुरळीत चालवायचा असेल तर कामगार बांधवांच्या मागण्यांसंदर्भात प्राधान्य पूर्वक लक्ष देण्याची गरज आहे. अन्यथा कंपनीच्या व्यवस्थापनाला याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील. कामगार संघटनेतर्फे कंपनीच्या व्यवस्थापनाला मंगळवार पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे. अन्यथा बुधवारी हा संप चिघळेल व त्याची पूर्ण जबाबदारी व्यवस्थापनाची राहणार असल्याचा इशारा यावेळी यांनी दिला आहे. सदर संघटनेचे पदाधिकारी गणेश खंडारे यांनी सांगितले की गेल्या तीन वर्षापासून कंपनीच्या व्यवस्थापनाने या कामगारांना पिळण्याचा प्रकार केलेला आहे. आता यापुढे ते सहन केले जाणार नसल्याचा इशारा देण्यात आलेला आहे.

चोख पोलीस बंदोबस्त.

दरम्यान कामगार संघटनेने पुकारलेला संप त्याच्या पार्श्वभूमीवर सरकारने याची विशेष दखल घेऊन मोठय़ा प्रमाणात पोलिस फौजफाटा तैनात केला होता .वाळपईचे निरीक्षक हरीश गावस व डिचोली पोलीस निरीक्षक महेश गडेकर यांच्या नेतृत्वाखाली चोख बंदोबस्त लावण्यात आला होता. सत्तरी तालुक्मयाच्या उपजिल्हाधिकारी प्रवीण परब संयुक्त मामलेदार संजीवनी सातार्डेकर विशेष अधिकारी म्हणून अनिल राणे सरदेसाई व अनंत मळीक यांची खास नियुक्ती करण्यात आली होती.

Related Stories

तर बांधकाम व्यवसाय कोलमडून पडणार..!

Omkar B

केपे पालिकेत आणखी 6 अर्ज दाखल

Amit Kulkarni

रेल्वेच्या पार्सल एक्सप्रेस रेलगाडीला चांगला प्रतिसाद

Omkar B

डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमवर कोविड केअर सेंटर

tarunbharat

म्हादई अभयारण्याच्या देरोडे येथील टेहळणी केंद्राला स्थानिकांचा कडक विरोध

Patil_p

अकरावीच्या जागा 15 टक्के वाढवा

Amit Kulkarni
error: Content is protected !!