तरुण भारत

भाजप स्वतंत्रपणे निवडणूक लढवू शकतो

प्रतिनिधी /पणजी

 भाजप समवीचारी पक्षांबरोबर युती करण्यास तयार आहे याचा अर्थ असा नव्हे की भाजप स्वतंत्रपणे विधानसभा निवडणूकीला सामोरे जायला घाबरतात. सामाजीकदाईत्व विचारधारा आणि केलेल्या विकासकामाच्या आधारावर भाजप निवडणूक लढवणार आणि पूर्णबहुमताने निवडूनही येणार असे भाजपाचे  प्रवक्ता दामू नाईक यांनी सांगितले. भाजपा सोबोत अधिकाधिक आमदार असावेत या उद्देशानेच भाजपने समवीचारी पक्षाबरोबर युतीसाठी हात पुढे केले असल्याचेही सांगितले.

Advertisements

 काल सोमवारी भाजपने आपल्या कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परीषदेत दामू नाईक बोलत होते. पुढे बोलतांना ते म्हणाले की भाजपाने मागील निवडणूकीत आपल्या जाहिरनाम्यात जी आश्वासने दिली त्यातील अधिकाधिक कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे. भाजपाने गोव्याच्या विकासाच्याबाबत जे काही केले आहे ते जनते समोर आहे. जनतेचा भाजपावर विश्वास असून जनता आम्हाला योग्य निर्णय देणार असल्याचा विश्वास दामू नाईक यांनी व्यक्त केला आहे.

विधानसभा निवडणूक जशी जवळ येऊ लागली तसे राजकारणाला वेगवेगळा रंग चडू लागला आहे. विविध पक्ष गोव्यात येऊन आपले नशीब आजमावण्याचा प्रयत्न करीत आहे. अनेक पक्ष थापा मारून गोमंतकीयांची दिशाभूल करीत आहेत.  गोव्यातील शांतादुर्गा शांत असली तरी वेळोवेळी तिनेही उग्र रुप धारण केले आहे. अशी आख्यायीका आहे. गोव्यात पच्छिमबंगालच्या देवीची गरज नाही. पच्छिमबंगालमध्ये काय सुरु आहे ते गोवा फॉवर्डने अगोदर पहावे गोवा फॉवर्डच्या कार्यकारी अध्यक्षांनी गोव्यातील लोकांसमोर थापा मारू नये. गोवा हा शांतप्रिय प्रदेश आहे. सर्वधार्माचे लोक गोव्यात गुण्यागोवींदाने नांदत आहे. राजकारणात देवदवतांना आणून धार्मीक तंटे निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये असेही दामू नाईक यांनी  सांगितले.

केंद्रात भाजपाचे सरकार असून गोव्याच्या विकासासाठी केंद्रसरकारकडून भरघोस मदत मिळाली आहे व पुढेही ती मिळत रहाणार. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रुपात भारताला मिळालेला निस्वर्थी आणि स्वच्छ चारीत्र्याचा पंतप्रधान मिळालेला आहे. देशाच्या विकासाची धुरा ते खंबीरपणे सांभाळत आहे. आज काही लोक च्यांचे ज्ञान अर्धवट आहे ते पेट्रोलच्या दरवाड विषयावरून मोदींवर टीका करण्याचा प्रयत्न करीत आहेत. काँग्रेस सरकारच्या काळात केवळ 25 हजार कोटी रुपये व्याज भरावे लागत होते त्याच्यावर तोडगा काढून ते आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला आहे. टीका करण्याचा प्रयत्न करणाऱयांनी या गोष्टींचा अभ्यास अगोदर करावा असेही दामू म्हणाले. केंद्र सरकारातील भाजपाच्या मंत्र्यावर भ्रष्टाचाराचा डाग नाही. केवळ देशाचे हित मनात ठेऊनच केंद्रीयमंत्री काम करीत आहे. असेही दामू नाईक यांनी सांगितले.

Related Stories

‘त्या’ खारफुटींची अधिकाऱयांकडून पाहणी

Amit Kulkarni

बाधितांची संख्या घटली कोरोनामुक्तांमध्ये वाढ बळी जाणेही झाले कमी

Omkar B

‘ऍन्टिजॅन’ चाचणी सुरू

Omkar B

मोसमाच्या पहिल्या दिवशी बहुतांश ट्रॉलर्स जेटीवरच

Amit Kulkarni

ऍडव्होकेट जनरल देविदास पांगम यांचा सत्कार

Patil_p

ऑनलाईन कर वसुलीसाठी मडगाव पालिकेचे प्रयत्न

Omkar B
error: Content is protected !!