तरुण भारत

दिवाळीनंतर मडगाव पालिकेकडून जैववैद्यकीय कचरा उचल बंद

मुख्याधिकाऱयांकडून बैठकीत माहिती : सरकारनियुक्त यंत्रणेशी सामंजस्य करार करण्याचे निर्देश

प्रतिनिधी /मडगाव

Advertisements

मडगाव पालिका क्षेत्रातील जैववैद्यकीय कचऱयाशी सर्व संबंधितांची एक बैठक मुख्याधिकारी आग्नेलो फर्नांडिस यांनी सोमवारी सकाळी घेतली. यावेळी दिवाळीनंतर जैववैद्यकीय कचरा उचल पालिकेकडून वंद करण्यात येईल व सरकारने नियुक्त केलेल्या एजन्सीकडून हा कचरा उचलला जाईल. त्यासाठी दवाखाने, इस्पितळे, अन्य संबंधितांनी सदर यंत्रणेकडे सामंजस्य करार करावा, असे निर्देश देण्यात आले.

मुख्याधिकाऱयांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केल्यानंतर माहिती दिली की, बैठक बोलविण्याचे कारण पालिकेने आजपर्यंत गोळा केलेल्या जैववैद्यकीय कचऱयाचे संक्रमण सुलभ करणे हे आहे. आता सरकारने कुंडई औद्योगिक वसाहतीमध्ये बायोमेडिकल ट्रिटमेंट सुविधा उभारली आहे. सर्व आरोग्य सेवा-सुविधांनी सरकारने नियुक्त केलेल्या या एजन्सीसोबत सामंजस्य करार केला पाहिजे आणि जैववैद्यकीय कचरा गोळा करण्यासाठी यापुढे पालिकेवर अवलंबून राहू नये. यापुढे मडगाव पालिका कार्यक्षेत्रातील सर्व आरोग्य सेवा एजन्सींकडून जैववैद्यकीय कचरा पालिकेने गोळा करू नये यासाठी गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाचे निर्देश आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.

या विषयावरून सविस्तर चर्चा केल्यानंतर पालिकेने दिवाळीनंतर आरोग्य सेवा संस्थांकडून जैववैद्यकीय कचरा संकलन थांबवण्याचा निर्णय घेतला. या प्रकारचा कचरा गोळा करणे कठीण असल्याने माझ्या कर्मचाऱयांना त्रास झाला आहे. तथापि पालिकेकडून इतर प्रकारचा कचरा गोळा करणे चालू राहील. बायोटिक वेस्ट सोल्युशन ही सदर जैववैद्यकीय कचरा उचल करण्यासाठी सरकारने निवडलेली एजन्सी आहे.  मडगावातील प्रत्येक आरोग्य सेवा, सुविधेला या एजन्सीकडे सामंजस्य करार करावा लागेल आणि जैववैद्यकीय कचरा त्यांच्याकडे सोपवावा लागेल. मडगावात 350 आरोग्य सेवा केंदे आहेत. मात्र या एजन्सीशी आतापर्यंत फक्त 30 जणांनी करार केला आहे, असे मुख्याधिकारी फर्नांडिस यांनी नजरेस आणून दिले.

Related Stories

कोकणीचे अस्तित्व संपविण्याचा सरकारचा घाट

Amit Kulkarni

बोरी, शिरोडा भागात डेंग्यूचा फैलाव

Amit Kulkarni

कोंकण मराठा सांस्कृतिक संस्थेचे किरण नाईक अध्यक्ष

Amit Kulkarni

दुर्लक्षित घटकांच्या समस्या सोडविणार : मुख्यमंत्री

Patil_p

पणजीत सुशोभित गणेश विसर्जनस्थळांचे उद्घाटन

Amit Kulkarni

आता पाणी ग्राहकांसाठी एकरकमी परतफेड योजना

Patil_p
error: Content is protected !!