तरुण भारत

ऑक्सिजनअभावी मृत्यू ओढवल्याचे म्हणणे चुकीचे

गोमेकॉ ऑक्सिजन असेसमेन्ट अहवालात स्पष्ट

प्रतिनिधी /पणजी

Advertisements

गोमेकॉच्या चौथ्या मजल्यावर ऑक्सिजन पुरवठा होत नाही, तिथपर्यंत ऑक्सिजन पोहचण्यासाठी तेवढा दाब मिळत नाही. सिलिंडर ट्रॉली बदलताना दाब आणखी कमी होतो. त्यामुळे रुग्ण आणि वैद्यकीय स्टाफची तारांबळ उडाली, पण त्यामुळे ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे गोमेकॉत मृत्यू ओढवले असे म्हणता येणार नाही, असे गोमेकॉ ऑक्सिजन असेसमेन्ट रिपोर्टमध्ये म्हटले आहे.

आयआयटीचे संचालक डॉ. बी. के. मिश्रा, गोमेकॉचे माजी डीन व्ही. एन. जिंदाल व सरकारचे महसूल सचिव आय. ए. एम अधिकारी संजय कुमार यांनी हा अहवाल तयार करून दि. 23 जुलै 2021 रोजी सरकारला सादर केला आहे. गोमेकॉत पहाटे 2 ते 6 वाजण्याच्या काळात कोविड रुग्ण मरतात असे आढळल्यामुळे सरकारने त्रिसदस्यीय समिती नेमून चौकशी करण्याचा आदेश दिला होता.

या समितीने 34 पानी अहवाल दिला. त्यात ट्रॉलीद्वारे ऑक्सिजन पुरवठा करणे ही जुनी पद्धत आहे. गोमेकॉच्या चौथ्या मजल्यावर कोरोना वॉर्ड असून इथपर्यंत ऑक्सिजनचा दाब कमी असतो, असे या अहवालात म्हटले आहे. जे मृत्यू ओढवले ते ऑक्सिजन कमतरतेमुळे झाले असे या अहवालात कुठेच म्हटलेले नाही.

ऑक्सिजन पुरवठा तंत्रज्ञान सुधारणासाठी गोव्यातील एखाद्या अभियांत्रिकी महाविद्यालयाकडे जबाबदारी द्यावी, तेथील विद्यार्थी उपाय सुचवू शकतात. एल. एम. ओ टाकी बांधल्यापासून ऑक्सिजनचा योग्य पुरवठा होतो, असे समितीला आढळले आहे. गोमेकॉ परिसरात क्रायोजेनिक गॅस स्टोरेज टाकी असून कंत्राटदाराशी चाललेल्या वादामुळे ती टाकी वापराविना पडून आहे. त्याचा वापर ऑक्सिजन साठा ठेवण्यासाठी करता येऊ शकतो, मात्र ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प स्थापण्याची आवश्यकता नसल्याचे म्हटले आहे.

दर महिन्याला 240 ट्रॉली व वर्षाला 2890 ट्रॉली भरून ऑक्सिजन कोविड काळापूर्वी लागत होते. कोरोना काळात जेव्हा मागणी वाढली तेव्हा मेसर्स स्कूप आस्थापनाने गोमेकॉ वगळता इतर सरकारी इस्पितळाना ऑक्सिजन पुरवठा बंद केल्याचे या समितीने म्हटले आहे. जेव्हा आणिबाणीचा प्रसंग ओढवला तेव्हा गोमेकॉ आणि ऑक्सिजन पुरवठा कंपनीने दुसऱयाकडून मदत घेण्याऐवजी सदर प्रसंग आपल्या आपण हाताळण्याचा प्रयत्न केला, जर वेळेवर मदत घेतली असती तर गोमेकॉला अधिक मदत झाली असती, असे या अहवालात म्हटले आहे.

सुपर स्पेशालिटी ब्लॉक तयार झाला पण त्यात रुग्णांना पाठवण्यास डॉक्टर का तयार नव्हते, तेथे मात्र ऑक्सिजनचा पुरवठा चांगला होता. ऑक्सिजनचा पुरवठा कमी झाला तर टिशू हायपोक्सिया होऊन त्याचे नुकसान होते. वयस्क व व्याधीग्रस्तांना त्याचा अधिक त्रास होतो, त्यामुळे मृत्यूही संभवतो. कोविड, निमोनिया हाताळण्यासाठी ऑक्सिजनचा योग्य पुरवठा सातत्याने होणे आवश्यक असल्याचे खुद्द गोमेकॉच्या डीनचे म्हणणे असल्याचे या अहवालात म्हटले आहे. मेसर्स ऑक्सी नायट्रो आणि मेसर्स गोविंद पै यांनी दक्षिण गोव्यात ऑक्सिजन पुरवठा केल्याचा उल्लेख या अहवालात आहे. ऑक्सिजनमुळे मृत्यू झाल्याचे या अहवालात कुठेच मान्य केलेले नाही.

Related Stories

पंक्ती जोग यांना विप्लव हालमी पुरस्कार

Amit Kulkarni

सिद्धी नाईक मृत्यूप्रकरणी कुडचडे येथे मेणबत्ती फेरी

Amit Kulkarni

सोमवारी 437 कोरोनामुक्त चार बळी, 139 नवे बाधित

Omkar B

राज्यातील सहकारी पतसंस्थांच्या ठेवीधारकांना सुरक्षा कवच

Amit Kulkarni

खलाशांना आणण्यास आज शेवटची संधी

Omkar B

फसवे अंदाजपत्रक मुख्यमंत्र्यांकडून सादर

Patil_p
error: Content is protected !!