तरुण भारत

नामवंत चित्रकार वामन नावेलकर निवर्तले

प्रतिनिधी /पणजी

आंतरराष्ट्रीय ख्यातीचे प्रख्यात चित्रकार वामन नावेलकर यांचे वृद्धापकाळाने सोमवारी पहाटे 6.30 वा. एका इस्पितळात निधन झाले. ते 92 वर्षांचे होते. अंत्यसंस्कार सोमवारी दुपारी 12.30 वा. सांतईनेज पणजी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

Advertisements

आंतरराष्ट्रीय ख्यातीचे व नामवंत असे चित्रकार वामन नावेलकर यांच्या निधनाने गोवाच नव्हे तर देश एका गुणी कलाकाराला मुकला आहे, अशा प्रतिक्रिया नावेलकर यांच्या चाहत्यांकडून ऐकायला मिळाल्या. गोव्यात, मुंबईत कलेचे शिक्षण घेऊन नावेलकर हे मोझांबिक, पोर्तुगाल, लिस्बन व पॅरीस येथे गेले. तिथे त्यांच्या चित्रांच्या प्रदर्शनास उदंड प्रतिसाद लाभला. 1954 मध्ये वामन नावेलकर हे पोर्तुगालला गेले व तिथे ते स्थायिक झाले.

1980 च्या दरम्यान ते गोव्यात आले. त्यानंतरही ते अनेक देशात जाऊन आले. अविवाहित असलेल्या वामन नावेलकर यांच्यावर गोव्यातील दोन युवकांनी अलिकडेच एक डोक्युमेंटरी तयार केली असून त्यांना ती आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सादर करायची होती. नावेलकर यांच्या पश्चात त्यांचा पुतण्या आहे. वयाच्या 92 व्या वर्षी एका इस्पितळात नावेलकर यांनी अखेरचा श्वास घेतला. दुपारी सांतईनेज येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. गोवा विधानसभेने चित्रकार वामन नावेलकर यांना श्रद्धांजली वाहिली. नावेलकर यांच्या चित्रांचे प्रदर्शन लंडन, पॅरीस सारख्या जागतिक पातळीवरील वस्तुसंग्रहालयात लावण्यात आलेले आहे.

Related Stories

काणकोणातील मार्केट यार्डात काजुविक्रीसाठी शेतकऱयांची गर्दी

Patil_p

नळाच्या पाण्यात प्लास्टिकचे सुक्ष्म कण

Amit Kulkarni

चोपडे येथील नागरिकांचा तरंगत्या जेटीस विरोध

Patil_p

शैक्षणिक संस्थांबाबत राज्याचे अद्याप निर्देश नाही

Omkar B

दामु नाईक यांनी गोमंतकीयांची माफी मागावी

Patil_p

503 नवे रुग्ण, 688 जण कोरोनामुक्त

Patil_p
error: Content is protected !!