तरुण भारत

साडेनऊ महिन्यांत सोळा खून प्रकरणांची नोंद

प्रतिनिधी /पणजी

राज्यातील विविध पोलीस स्थानकात गेल्या साडेनऊ महिन्यांत 16 खून प्रकरणांची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणातील 15 खून प्रकरणाचा छडा  लावून संशयितांना अटक केली आहे. केवळ एका खून प्रकरणातील संशयिताला अटक करण्यात पोलीस अपयशी ठरले आहेत.

Advertisements

एकंदरित आढावा घेतला तर 2020 मध्ये याच काळात राज्यातील विविध पोलीस स्थानकात तब्बल 27 खून प्रकरणांची नोंद झाली होती. सर्व प्रकरणांचा तपास करून संशयितांना गजाआड करण्यात पोलीस यशस्वी ठरले होते. गोवा हे पर्यटकस्थळ म्हणून जागतिक स्तरावर सुप्रसिद्ध आहे. पर्यटक म्हणून तसेच इतर विविध कारणांसाठी परप्रांतातील लोक गोव्यात मोठय़ाप्रमाणात येत असतात. राज्यात घडणाऱया अधिकाधिक गुन्हेगारी प्रकरणात परप्रांतीय लोकांचा समावेश असल्याचे दिसून येत आहे. फोंडा येथे दोन महिलांचा खून करणारा संशयित हा मूळ कर्नाटकातील असून गेल्या कित्येक वर्षांपासून तो गोव्यात राहत होता. हणजूण येथे झालेल्या खून प्रकरणातील संशयितही पर्यटक म्हणून गोव्यात आले होते. नंतर पार्किंगच्या वादावरून त्यांची बाचाबाची झाली आणि त्यातच सागर नाईक याचा खून झाला. याप्रकरणी पर्यटक म्हणून गोव्यात आलेल्या कर्नाटकातील पाच पर्यटकांना अटक करण्यात आली होती. शिवोली येथे झालेल्या खून प्रकरणात रशियन नागरिकाला अटक करण्यात आली होती.

Related Stories

पर्तगाळी मठात 30 रोजी गुरूपीठारोहण सोहळा 31 पासून चतुर्मास व्रताचरणाला प्रारंभ

Amit Kulkarni

पावसाने गोव्याला झोडपले

Amit Kulkarni

रविवारी कोरोनाचे दोन बळी

Omkar B

लॉकडाऊन काळात बेघर झालेल्या वृध्देची वृध्दाश्रमात रवानगी

Omkar B

गुंड अन्वर शेख-टायगरचा खात्मा

Amit Kulkarni

मागण्या मान्य न झाल्यास न्यायालयात जाणार

Patil_p
error: Content is protected !!