तरुण भारत

मुख्यमंत्री, आरोग्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा : सरदेसाई

गोमेकॉतील ऑक्सिजन घोटाळा प्रकरण

प्रतिनिधी /पणजी

Advertisements

गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या इस्पितळात दि. 10 ते 14 मे 2021 या 5 दिवसात 80 कोविड रुग्णांचा ऑक्सिजनअभावी मृत्यू झाला. गोमेकॉतील या ऑक्सिजन घोटाळ्याची जबाबदारी स्वीकारुन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी विजय सरदेसाई यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केली.

विधानसभेतील प्रश्न पुढे ढकलले म्हणून आपण विधानसभेत विरोध केला नाही तर आरोग्यमंत्र्यांचा राजीनामा मागून आपण निषेध केला आहे. ऑक्सिजन अभावी कोविड रुग्ण मरु लागल्यामुळे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन न्यायालयीन चौकशी व्हावी. तसेच उच्च न्यायालयाने यात हस्तक्षेप करुन निवृत्त न्यायमूर्तीद्वारे चौकशी करावी, अशी मागणी केली होती.

मुख्यमंत्र्यांनी ऑक्सिजन पुरवण्याची जबाबदारी घेऊन तीन सदस्यीय समिती नियुक्त करुन चौकशी करायला लावली. डॉ. बी. के. मिश्रा, डॉ. व्ही. एन जिंदाल व संजय कुमार या त्रिसदस्य समितीने आपला अहवाल दिला आहे. या अहवालात त्यांनी सरकारची अव्यवस्था उघडी पाडली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांनी जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्यावा, अशी मागणी केली.

Related Stories

विरोधकांचा सभागृहात प्रचंड गदारोळ

Amit Kulkarni

प्रतापसिंह राणे यांना पुन्हा निवडणुकीत उतरण्याचा आग्रह

Amit Kulkarni

उर्मिला चाकूरकर यांच्या साहित्यावर पणजीत 2 रोजी चर्चासत्र, कविसंमेलन

Amit Kulkarni

आरोग्य अधिकारी भासवून महिलेने घरात डांबून लुटले

Patil_p

कोरोना ‘बायोसेफ्टी मशिन’ बनले शोभेची वस्तू

Omkar B

काणकोण मतदारसंघाला परिवर्तन, नव्या चेहऱयाची गरज

Patil_p
error: Content is protected !!