तरुण भारत

आनंद क्रिकेट अकादमीकडे नीना चषक

13 वर्षाखालील स्पर्धेत अभिनव शर्मा मालिकावीर, निलेश रणसुभे सामनावीर

क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव

Advertisements

नीना स्पोर्ट्स क्लब आयोजित निमंत्रितांच्या 13 वर्षाखालील आंतरक्लब क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात आनंद क्रिकेट अकादमी संघाने बेळगाव स्पोर्ट्स क्लब अ संघाचा 13 धावानी पराभव करून पहिला निमंत्रितांचा नीना चषक पटकाविला. अभिनव शर्माला मालिकावीर तर निलेश रणसुभेला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.

युनियन जिमखाना मैदानावर उपांत्य सामन्यात आनंद क्रिकेट अकादमी संघाने विजय अकादमी संघाचा 48 धावांनी तर दुसऱया उपांत्य सामन्यात बेळगाव स्पोर्ट्स क्लब अ संघाने सीसीआय संघाचा 94 धावानी पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. श्लोक व जयशांत यांना सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. अंतिम सामन्यात आनंद क्रिकेट अकादमी संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 25 षटकात 4 गडी बाद 158 धावा केल्या. त्यात सुप्रित गेंजीने 1 षटकार 7 चौकारासह 61 तर निलेश रणसुभेने 7 चौकारासह 50 धावा केल्या. बेळगाव स्पोर्ट्स क्लबतर्फे सोहम पाटीलने 1 गडी बाद केला.

प्रत्युत्तरादाखल बेळगाव स्पोर्ट्स क्लब संघाने 25 षटकात 5 गडी बाद 145 धावाच केल्या. आरूष पुत्रणने 5 चौकारासह 44, सुरेंद्र पाटीलने 5 चौकारासह 41, तर जयशांत यशने 1 षटकार 1 चौकारासह 32 धावा केल्या. आनंद अकादमीतर्फे निलेश आर. ने 16 धावात 2 तर सुप्रित गेंजीने 1 गडी बाद केला.

सामन्यानंतर प्रमुख पाहुणे प्रणय शेट्टी, महंमद ताहिर सराफ, जावेद फनिबंद, अन्वर द्राक्षी, साकीब सराफ आदी मान्यवरांच्या हस्ते विजेत्या आनंद क्रिकेट अकादमी संघाला व उपविजेत्या बेळगाव स्पोर्ट्स क्लब संघाला चषक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज सुमित भोसले (बीएससी), उत्कृष्ट गोलंदाज अनिश तेंडुलकर (जिमखाना) उत्कृष्ट यष्टीरक्षक श्रेयस बोकडे (नीना), अंतिम सामन्यातील सामनावीर निलेश रणसुभे (आनंद) यांना चषक देऊन गौरविण्यात आले.

Related Stories

सामाजिक उपक्रमांमधून साजरी होणार ऐतिहासिक शिवजयंती

Patil_p

बडस येथील हॉस्पिटलला ठोकले टाळे

Amit Kulkarni

हिंडलगा लोकमान्य सोसायटीतर्फे वाहन तपासणी-नेत्रचिकित्सा शिबिर

Amit Kulkarni

योग दिन आज ऑनलाईनद्वारे साजरा करणार

Patil_p

साठे प्रबोधिनीच्या बोलीभाषा शब्दसंग्रह स्पर्धेचा निकाल जाहीर

Patil_p

अखेर ‘त्या’ पाच नराधमांना जन्मठेप

Patil_p
error: Content is protected !!