तरुण भारत

सिक्स-ए-साईड स्पर्धेच्या माध्यमातून सर्वमला 65 हजारांची मदत

21 वर्षाखालील फुटबॉल स्पर्धा : दुबई एफसीकडे सर्वम चषक

क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव

Advertisements

बेळगाव फुटबॉल लव्हर्स आयोजित सिक्स ए साईड सर्वम चषक 21 वर्षा खालील फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दुबई एफसीने टर्फ केए 22 संघाचा 3-1 असा पराभव करून सर्वम चषक पटकाविला. कौशिक पाटीलला उत्कृष्ट खेळाडू म्हणून गौरविण्यात आले.

सर्वम बाळेकुंद्री या तान्हुल्या बाळाला मोठा आजार झाला आहे. त्याला 16 कोटी रूपयाच्या इंजेक्शनची गरज असून, त्याच्या मदतीसाठी बेळगावच्या फुटबॉल लव्हर्स संघटनेने 19 वर्षाखालील सिक्स ए साईड फुटबॉल स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत एकूण 20 संघानी भाग घेतला होता. यावेळी सर्वमला 65 हजार रूपयांची मदत देण्यात आली.

अंतिम सामना दुबई एफसी विरूद्ध टर्फ के ए 22 यांच्यात झाला. प्रारंभी टर्फ के ए 22 संघाच्या तुषारने पहिला गोल केला तर दुसऱया सत्रात दुबई एफ सी संघाच्या सिद्धार्थ शिंदेने सलग 2 गोल करून 2-1 अशी आघाडी मिळवून दिली. खेळ संपण्यास एक मिनिट बाकी असताना दुबई एफसीच्या धनंजय शिंदेने गोल करून 3-1 ची आघाडी मिळवून दिली. शेवटी हा सामना दुबई एफसीने जिंकला. सामन्यानंतर प्रमुख पाहुणे सर्वमचे आई वडिल, हर्ष जॉन थॉमस, प्रदीप होसमनी, सुरज मजुकर, ऍड. अनुराधा पाटील, बीटा क्लबचे सौरभ बिर्जे यांच्या हस्ते विजेत्या दुबई एफ सी व उपविजेत्या टर्फ केए 22 संघांना रोख रक्कम व आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेत उत्कृष्ट खेळाडू म्हणून कौशिक पाटील, उत्कृष्ट गोलरक्षक विनायक शिंके, उत्कृष्ट आघाडीपटू सिद्धार्थ शिंदे, उत्कृष्ट बचावपटू ऍलेस्टन परेरा यांना चषक व रोख रक्कम देवून गौरविण्यात आले. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विजय रेडेकर, किरण चव्हाण, निलेश साळुंके, अमरदीप पाटील, साहिल, विवेक सनदी, राकेश धाकलुचे, नविन किनगी, तुषार पवार यांनी विशेष परिश्रम घेतले.

Related Stories

मध्यरात्री शेतवडीत ट्रक क्लिनरचा खून

Patil_p

परगावाहून येणाऱयांनी नियम पाळण्याची गरज

Omkar B

गतवषीच्या तुलनेत यंदा दिवाळीसाठी धावताहेत कमी बसेस

Patil_p

शेड उभारण्यावरून वादावादी

Amit Kulkarni

पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी केल्या अधिकाऱयांना सूचना

Patil_p

जॉन फर्नांडिस यांच्या चित्रांचे 5 फेब्रुवारीपासून प्रदर्शन

Patil_p
error: Content is protected !!