तरुण भारत

बेंगळूरचा श्रवणन हरिराम दसरा श्री किताबाचा मानकरी

शिमोगा येथे आयोजित शरीरसौष्ठव स्पर्धा : नित्यानंद कोटीयान उपविजेता, उमेश गंगणे उत्कृष्ट पोझर

क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव

Advertisements

कर्नाटक राज्य संघटना व शिमोगा जिल्हा संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने युवा दसरा श्री राज्यस्तरीय शरीरसौष्टव स्पर्धेत बेंगळूरच्या श्रवणन हरिराम याने युवा दसरा श्री हा मानाचा किताब पटकाविला. उडुपीचा नित्यानंद कोटियन उपविजेता ठरला. बेळगावच्या उमेश गंगणे याने उत्कृष्ट पोझरचा बहुमान मिळविला.

शिमोगा येथे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत राज्यातून जवळपास 136 हून अधिक शरीरसौष्टवपटूंनी भाग घेतला. या स्पर्धेत 55 किलो वजनी गटात 1) आकाश निनगराणी (बेळगाव) 2) महंमद शाफर (शिमोगा), 3) बीट्टू झंगरूचे (बेळगाव), 4) नितेशकुमार चिक्कमंगळूर, 5) दस्तगीर (शिमोगा). 60 किलो गट – 1) उमेश गंगणे (बेळगाव), 2) दिनेश नाईक (बेळगाव), 3) अविनाश मंतूर (धारवाड), 4) मिश्चिन कांबळे (धारवाड), 5) सलमान खान (शिमोगा). 65 किलो गट – 1) प्रताप कालकुंद्रीकर (बेळगाव), 2) सोमशेखर कारवी (उडुपी), 3) मदन कीलगी नबाब (धारवाड), 4) रघुनंदन (बेंगळूर) ओमकार गोडसे (बेळगाव). 70 किलो गट – 1) श्रीनन हरेराम (बेंगळूर), 2) तानाजी चौगुली (बेळगाव), 3) बसवाणी गुरव (बेळगाव), 4) मल्लीकार्जुन अंबीगार (बेंगळूर), 5) अभिषेक पुजारी (मंगळूर). 75 किलो गट – 1) मेहबूमा बाशा (बळ्ळारी), 2) निखील आर. (शिमोगा), 3) साहिल (मंगळूर), 4) आकाश जाधव विजापूर, 5) राहुल नागपूर (धारवाड). 80 किलो गट – 1) गजानन काकतीकर (बेळगाव), 2) जहर (उडुपी), 3) महंमद राहिल (शिमोगा), 4) आकाश एस. कुमार (उडुपी), 5) शैलेशकुमार मंगळूर. 80 वरील गट – 1) नित्यानंद कोटीयान (उडुपी), 2) पवनकुमार एम. एम. (शिमोगा), 3) आनंद एच. एम. (धारवाड), 4) दर्शन एम. शिमोगा. यांनी आपापल्या गटात विजेतेपद पटकाविले. त्यानंतर युवा दसरा श्री किताबासाठी आकाश निनगराणी, उमेश गंगणे, प्रताप कालकुंद्रीकर, श्रवणन हरिराम, मेहबूब पाशा, गजानन काकतीकर व नित्यानंद कोटीयान यांच्या लढत झाली. त्यामध्ये नित्यानंद कोटीयान व श्रवणन हरिराम यांच्यात चुरस रंगत राहिली. त्यामध्ये श्रवणनने युवा दसरा श्री हा मानाचा किताब पटकाविला. नित्यानंद कोटीयान याला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. उत्कृष्ट पोझरचा किताब बेळगावच्या उमेश गंगणे याने पटकाविला. जेत्यांना पाहुण्यांच्या हस्ते आकर्षक चषक, मानाचा किताब देवून गौरविण्यात आले. 

या स्पर्धेसाठी पंच म्हणून जे. डी. भट, अजित सिद्दण्णावर, उमा महेश्वर, जय निळकंठ, गंगाधर एम., अनंत लंगरकांडे, सुनिल पवार, आदीनी काम पाहिले तर स्टेज मार्शल म्हणून सुनिल राऊत यांनी काम पाहिले.

Related Stories

‘महाराष्ट्र राज्य येळ्ळूर’ खटल्याची सुनावणी पुन्हा लांबणीवर

Omkar B

मनपाला प्रतीक्षा जीवितहानीची?

Amit Kulkarni

वसंत व्याख्यानमालेतर्फे वृत्तलेखनावर कार्यशाळा

Omkar B

हुल्लडबाजी करणाऱया कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज

Amit Kulkarni

चक्क पेट्रोलपंपातून गाडय़ांमध्ये भरण्यात आले पाणी…

Amit Kulkarni

एक वर्ष दुष्ट चक्रातले

Amit Kulkarni
error: Content is protected !!