तरुण भारत

मातृभूमी सेवा फार्मर प्रोडय़ुसर कंपनीच्या कार्यालयाचे उद्घाटन

कचऱयापासून मुक्तीसाठी धरनट्टी येथे प्रकल्प साकारणार

प्रतिनिधी /बेळगाव

Advertisements

मातृभूमी सेवा फार्मर प्रोडय़ुसर कंपनी लि. च्या प्रकल्प कार्यालयाचे सोमवारी  मेन रोड वडगाव येथे उद्घाटन करण्यात आले. खासदार मंगला अंगडी, माजी आमदार संजय पाटील, आमदार सतीश जारकीहोळी, कृषी विभागाचे सहसंचालक शिवनगौडा पाटील, पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे यांच्या उपस्थितीत या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. कचरामुक्त करून शेतकऱयांना रोजगार मिळवून देण्यासाठी हा प्रकल्प काम करणार आहे.

मातृभूमी सेवा फार्मर प्रोडय़ुसर कंपनी लि. ने कचऱयापासून मुक्त होण्यासाठी प्रकल्प सुरू केला आहे. शेतकऱयांच्या शेतीतील हत्ती जातीचे गवत खरेदी करून त्यापासून सीएनजी प्रकल्पातून जैवइंधन तयार करण्यात येणार आहे. इंधनाला पर्याय म्हणून जैवइंधन वापरले जाणार आहे. याचसोबत या प्रकल्पातून अधिकाधिक रोजगार निर्मिती करण्याचा प्रयत्न मातृभूमी सेवा फार्मर प्रोडय़ुसर कंपनी करीत असल्याचे बेळगाव तालुक्मयाचे प्रभारी विशाल कोडते यांनी सांगितले.

प्रारंभी कंपनीच्यावतीने सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. खासदार अंगडी यांनी कंपनीच्या कार्याचे कौतुक करत या प्रकल्पासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. शिवनगौडा पाटील यांनी कृषी खात्यातर्फे सहकार्याचे आश्वासन दिले. हुदलीजवळील धरनट्टी येथे हा प्रकल्प साकारला जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

या कार्यक्रमाला चेअरमन मसणू पाटील, खानापूर प्रतिनिधी श्रीनिवास धोत्रे, हुक्केरी-संतोष कुष्टे, निपाणी-संजीव जाधव, औराद-सतीश बेळकोटी यांच्यासह तालुक्मयातील 48 ग्राम पंचायतींचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Related Stories

शिक्षक बदलीसाठी जिल्हय़ात 2 हजार 927 अर्ज

Patil_p

केबल कट ; करमणूक थांबली

Patil_p

शनिवारी 232 जणांचा अहवाल निगेटिव्ह

Patil_p

सिव्हिल हॉस्पिटलमधील कारभार सुधारणे गरजेचे

Amit Kulkarni

भारत बंदला कुडचीत उत्स्फूर्त प्रतिसाद

Patil_p

मराठा समाज मंडळातर्फे मनोहर बिर्जे यांना श्रद्धांजली

Amit Kulkarni
error: Content is protected !!