तरुण भारत

सरस्वती वाचनालयाची वार्षिक सभा उत्साहात

प्रतिनिधी /बेळगाव

शहापूर येथील सरस्वती वाचनालयाची वार्षिक सर्वसाधारण सभा माई ठाकुर सभागृहात पार पडली. वाचनालयाच्या अध्यक्षा प्रा. स्वरूपा इनामदार यांनी स्वागत करून प्रास्ताविक केले.

Advertisements

सभेच्या सुरुवातीला वर्षभरात दिवंगत झालेल्या सभासदांना श्रद्धांजली वाहण्यात आली. कार्यवाह प्रा. आर. एम. करडीगुद्दी यांनी मागील वर्षाच्या कामकाजाचे वाचन केले. यानंतर अहवाल वाचन, जमा-खर्च, पुढील वर्षाचे अंदाजपत्रक यावर चर्चा होऊन ठराव सर्वानुमते स्वीकारण्यात आला.

सभेमध्ये विश्वस्त ऍड. अजय ए. सुनाळकर, ब्रिजमोहन लाहोटी, राजेंद्र कर्नाटकी, मधुसुदन किनारी, किरण इनामदार यांच्यासह सभासद व कार्यकारिणीचे पदाधिकारी उपस्थित होते. अध्यक्षीय भाषणात स्वरूपा इनामदार यांनी कोरोनामुळे वाचनालयात कार्यक्रम घेता आले नाहीत. यापुढे घेऊ असे सांगून वाचनालयाला सर्वांनी भरघोस आर्थिक मदत करून वाचनालय सुरळीत चालविण्यास मदत करावी, असे आवाहन केले.

Related Stories

लेप्टनंटपदि बढती-शिवोली ग्रामस्थातर्फे चांगाप्पा पाटील यांचा सत्कार

Rohan_P

धोकादायक वृक्ष हटविण्याची मागणी

Amit Kulkarni

चोर समजून केलेल्या मारहाणीत वृद्धाचा मृत्यू

Patil_p

लहान बहिणीला वाचविताना मोठ्या बहिणीने गमावले प्राण

Rohan_P

जवानाच्या कुटुंबावर बहिष्कार

Amit Kulkarni

हुबळी येथील संग्रहालयाचे लोकार्पण

Patil_p
error: Content is protected !!