तरुण भारत

सेन्सेक्सचा ऐतिहासिक विक्रम; पहिल्यांदाच ६२ हजार पार

मुंबई/प्रतिनिधी

गेल्या काही दिवसांपासून मुंबई शेअर बाजारात (share market) तेजी पहायला मिळत आहे. गेल्या महिनाभरात शेअर बाजाराने रोज नवनवे उच्चांक गाठले आहेत. शेअर बाजार आज पुन्हा एका नवीन उच्चांकासह उघडला आहे, ज्यामुळे आणखी एक इतिहास निर्माण झाला. बीएसईचा 30-स्टॉकचा निर्देशांक सेन्सेक्स (Sensex) ३९०.८९ अंकांसह ६२,१५६.४८ वर उघडला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी देखील १८,६०२.३५ च्या नवीन विक्रमासह व्यापार सुरु झाला आहे. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स २८९.१७ अंकांच्या वाढीसह ६२,०५४.७६ वर होता, तर निफ्टी ८०.५५ अंकांच्या वाढीसह १८,५५७.६० वर होता.

दरम्यान, सेन्सेक्स सुरुवातीच्या सत्रात ३९०.८९ अंकांनी वाढून ६२,१५६.४८ वर पोहोचला. तर निफ्टीने (nifty) १२७.४० अंकांची उडी घेत १८,६०४.४५ वर पोहोचला.

Advertisements

गुरुवारी सेन्सेक्स ६१ हजारच्या पार
दरम्यान, गुरुवार दि. १४ रोजी शेअर बाजार उघडताच सेन्सेक्सनं थेट ६१ हजारांच्या वर विक्रमी झेप घेतली होती. त्यामुळे खरेदी-विक्रीमध्ये मोठ्या हालचाली दिसून आल्या. दरम्यान, भांडवली बाजाराची सुरुवात झाली तेव्ह सेन्सेक्सने ३०७ अंकांची झेप घेतली, त्यावेळी सेन्सेक्स ६१,०४४.१५ वर गेला होता. , तर निफ्टी (Nifty) १८,२६१.१५ वर होता.

Related Stories

बिहारमध्ये कोरोना रुग्णांचा आकडा 25 हजारच्या उंबरठ्यावर

Rohan_P

गुजरातमध्ये भीषण दुर्घटना, 10 जण ठार

Patil_p

नेटग्रिड लवकरच येणार अस्तित्वात

Patil_p

दिल्लीत सप्टेंबरपासून शाळा गजबजणार

Patil_p

अमित शाहांवर गुन्हा का दाखल केला नाही? कर्नाटक उच्च न्यायालयाचा पोलीस आयुक्तांना सवाल

Abhijeet Shinde

माजी केंद्रीय मंत्री,भाजप नेते दिलीप गांधी यांचे निधन

Rohan_P
error: Content is protected !!