तरुण भारत

आरपीडी रोडशेजारील उघडे चेंबर पादचाऱयांसाठी धोकादायक

प्रतिनिधी /बेळगाव

स्मार्ट सिटी योजनेंतर्गत आरपीडी रोडचा विकास करण्यात आला आहे. पण येथील काही कामे अर्धवट असल्याने पादचाऱयांना धोका निर्माण झाला आहे. रस्त्याच्या दुतर्फा बांधण्यात आलेल्या गटारीच्या चेंबरवर झाकण नसल्याने चेंबर उघडे आहेत. त्यामुळे रात्रीच्या वेळी किंवा घाईगडबडीत जाणाऱया पादचाऱयांना धोका निर्माण झाला आहे.

Advertisements

स्मार्ट सिटी योजनेंतर्गत रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात आले आहे. तसेच रस्त्याच्या दुतर्फा गटारीसाठी पाईप घालण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे फुटपाथ निर्माण करण्यात आले आहेत. पाईप घालण्यात आल्याने ठिकठिकाणी चेंबर बनविण्यात आले असून त्यावर झाकण घालणे आवश्यक आहे. पण आरपीडी रोडशेजारी असलेल्या चेंबरवर झाकण नसल्याने धोका निर्माण झाला आहे. परिसरात विविध कॉलेज असल्याने नेहमी वर्दळ असते. फुटपाथचा वापर सर्रास केला जातो. तसेच काही मॉर्निंग वॉकर्स फिरावयास जात असतात. पहाटेच्यावेळी जाणाऱया नागरिकांना चेंबर असल्याचे लक्षात येत नाही. त्यामुळे उघडय़ा चेंबरचा धोका निर्माण झाला आहे. सदर चेंबरवर झाकण घालून अनर्थ टाळावा. स्मार्ट सिटीच्या अधिकाऱयांनी याकडे लक्ष देऊन नागरिकांच्या समस्येचे निवारण करावे, अशी मागणी होत आहे.

Related Stories

कोरोनाच्या संकटछायेत शुभ मुहूर्ताचा दिवस नीरव शांततेत

Patil_p

शेततळय़ात पडून 4 बालकांचा मृत्यू

Patil_p

ओमनी कारची अज्ञात वाहनाला धडक

Patil_p

शहर परिसरात गोकुळाष्टमी साजरी

Amit Kulkarni

जिल्हय़ात सोमवारी 399 जणांनी केली कोरोनावर मात

Amit Kulkarni

गणित विषयाच्या पेपरला 269 विद्यार्थ्यांनी मारली दांडी

Patil_p
error: Content is protected !!