तरुण भारत

सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील कोरोना रुग्ण संख्या आटोक्यात

प्रतिनिधी / सोलापूर

सोलापूर शहरातील महानगरपालिका क्षेत्रामध्ये कोरोना रुग्णसंख्या घटली. मात्र जिह्यातील ग्रामीण भागात कोरोनाची संख्या कमी होत नव्हती. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी कठोर निर्णय, योग्य नियोजन केल्यामुळे आता ग्रामीण भागातील रुग्णसंख्या 500 वरून केवळ 40 च्या आत आली आहे. सोमवारी केवळ 38 रुग्ण आढळले आहेत. शहराबरोबर आता ग्रामीण भागातली कोरोना रुग्ण संख्या आटोक्मयात आली आहे. विशेष म्हणजे कोरोनाने मृत्यू होण्याचे प्रमाणही घटले आहे.

Advertisements

एकीकडे शहरात कोरोनाची संख्या केवळ दोन किंवा पाच आढळत होती. तर दुसरीकडे ग्रामीण भागात 500 ते 700 रुग्ण आढळत होते. त्यामुळे नाईलाजास्तव जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, सीईओ दिलीप स्वामी यांनी कठोर निर्णय घेऊन ज्या तालुक्मयात संख्या जास्त आहे त्या तालुक्मयात कडक लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे माढा, माळशिरस, पंढरपूर, करमाळा आणि सांगोला या पाच तालुक्मयांसाठी प्रशासनाने दहा दिवसांचा लॉकडाऊन केला. यावेळी व्यापाऱयांचा प्रचंड विरोध झाला. तरीसुद्धा विरोधाला न जुमानता जिल्हाधिकारी  शंभरकर यांच्या निर्णयामुळे व महसूल, पोलीस व आरोग्य प्रशासनाच्या टीमने ग्रामीण भागातील कोरोना रुग्णसंख्या आटोक्मयात आणण्यासाठी प्रयत्न केले. अखेर  प्रयत्न यशस्वी झाले असून, ग्रामीण भागातील त्या पाच तालुक्मयांत व इतर तालुक्मयातील रुग्ण संख्या कमी झाली आहे. त्याचबरोबर मृत्यूचे प्रमाणही कमी झाले आहे.

नागरिकांनी कोरोना संपला म्हणून गाफील राहू नये

जिह्यातील ग्रामीण भागात कोरोना रुग्ण संख्या कमी करण्यासाठी निर्बंध लावले होते, ते शिथील करण्यात आले आहेत. सणासुदीत पुन्हा गर्दी होणे सहाजिक आहे. त्यामुळे नागरिकांनी कोरोना संपला असे समजून गाफील राहू नये. प्रत्येकाने जागरूक राहायला हवे. कोरोनाचे नियम पाळावे, लसीकरण करून घ्या. – मिलिंद शंभरकर, जिल्हाधिकारी

लसीकरणासाठी स्वतःहून पुढाकार घ्यावा

जिह्यातील ग्रामीण भागात कोरोना रुग्ण संख्या आटोक्मयात आली आहे. मिशन झिरो हे उद्दिष्ट ठेवून जिह्यातील कोरोना हद्दपार करण्यासाठी यंत्रणा सज्ज आहे. ज्या ठिकाणी रुग्ण आढळतात त्या ठिकाणी जिल्हा परिषदच्या वतीने विशेष लक्ष ठेवले जात आहे. जिह्यातील ग्रामीण भागातील नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता लसीकरण करून घ्यावे. सर्वाने कोरोनाचे नियम पाळावे. – दिलीप स्वामी, जि. प. सीईओ

Related Stories

सोलापूर : बार्शीत आज पाच कोरोनाबाधित रुग्णांची वाढ

Abhijeet Shinde

सोलापुरात फोफावतोय डेंग्यू, आतापर्यंत तिघांचा मृत्यू

Abhijeet Shinde

सोलापूर येथे ‘जिजाऊ जीवन गौरव पुरस्कार’ सोहळा संपन्न

Abhijeet Shinde

भागवताचार्य वा. ना. उत्पात यांचे निधन

Abhijeet Shinde

सोलापूर जिल्ह्यात लॉकडाऊनमध्ये सुमारे 77 लाखांचा दंड वसूल

Abhijeet Shinde

संचारबंदी : वैरागमध्ये भाजी- मंडईत मोठी गर्दी

Abhijeet Shinde
error: Content is protected !!