तरुण भारत

लखीमपूर हिंसाचार प्रकरणी आणखी 4 जण अटकेत

ऑनलाईन टीम / लखनऊ :

लखीमपूर खेरी येथे झालेल्या हिंसाचारात आंदोलक शेतकऱ्यांना चिरडणाऱ्या थार जीपमध्ये बसलेल्या सुमित जयस्वालसह अन्य तिघांना उत्तरप्रदेश पोलिसांनी अटक केली आहे. नंदन, शिशुपाल आणि सत्यप्रकाश अशी या तिघांची नावे आहेत. सत्यप्रकाशकडून परवानाधारक पिस्तूल आणि काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

Advertisements

सुमित जयस्वाल यानेच शेतकऱ्यांविरोधात खुनाचा एफआयआरही दाखल केला होता. तो केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आणि या हिंसाचार प्रकरणातील मुख्य आरोपी आशिष मिश्राचा निकटवर्तीय होता. शेतकऱ्यांना चिरडणाऱ्या जीपमध्ये सुमित होता. एका व्हिडिओमध्ये या घटनेनंतर तो पळून जाताना दिसत आहे. याप्रकरणात यापूर्वीच आशिष मिश्रा, माजी केंद्रीय मंत्री अखिलेश दास यांचा भाचा अंकित दास, लतीफ उर्फ काळे, शेखर आणि आशिष पांडे यांना अटक केली आहे.

Related Stories

दिल्लीत भूकंपाचे सौम्य धक्के

prashant_c

उत्तराखंड : कोरोना रुग्णांनी ओलांडला 55 हजारांचा टप्पा

Rohan_P

अयोध्येत तयार होतेय श्रीरामांची जगातील सर्वात उंच मूर्ती

datta jadhav

मध्यप्रदेशात पोलिसांची मोठी कारवाई; ‘इतक्या’ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त

Rohan_P

ओडिशा आणि उत्तराखंडात जाणवले भूकंपाचे धक्के

Rohan_P

दिल्लीतील रुग्णालयात होणार केवळ दिल्लीवासियांवरच उपचार : केजरीवाल

Rohan_P
error: Content is protected !!